🌟पापांचा घडा ओसंबडून भरल्यावर दुष्ट पाप्यांना प्रायश्चित्तावेळी अक्षरशः देव आठवतात ?


🌟पापांची गाठोडी पापी हृदयात साठवून पापांचे काळेकुट्ट डाग मात्र दगड मातीच्या मुर्त्यां आड दडवतात🌟

✍🏻कवी :- चौधरी दिनेश (रणजीत)

पापांचा घडा ओसंबडून भरल्यावर दुष्ट पाप्यांना प्रायश्चित्तावेळी अक्षरशः देव आठवतात ? मग काय तेहतीस कोटी देवी देवतांना पापी दृष्ट मदतीला धावण्याचे निमंत्रणांवर निमंत्रण पाठवतात ? 

कलयुगातली ही कौरव जाणीवपूर्वक केलेल्या पापांची गाठोडी स्वतःच्या पापी हृदयात साठवून पापांचे काळेकुट्ट डाग मात्र दगड मातीच्या मुर्त्यां आड दडवतात....!

संकटावेळी धावणाऱ्यांसह आप्त स्वकीयांच्या विरोधात कटकारस्थान रचणारी अमानुष जनावर भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःच्या जन्मदात्या माय-बापांना पायाखाली तुडवतात अन् स्वार्थापोटी निर्लज्जपणे समाजाला आपआपसात लढवतात,

गोरगरीब मजूरांच्या तोंडचा घास पळवणारी ही शैतानी प्रवृत्ती अहों चोरट्यांनी लचके तोडून आणलेला मुद्देमाल देखील सुरळीतपणे स्वतःच्या तिजोरीकडे वळवतात ? वेळ प्रसंगी धार्मिकतेचे ढोंग रचून देवाच्या दरबारातील मुद्देमालही पळवतात...!!

अरें यांचा कसला धर्म अन् यांना कसले देव ? नसतो या नटभ्रष्टांना स्वतःच्या जाती/धर्माचा स्वाभिमान लच्चर लबाड अन् बेईज्जत या अवलादी सामाजिक स्वास्थाला जडलेली ही कायमची जंतुयुक्त घाण ?

✍🏻कवी :- चौधरी दिनेश (रणजीत)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या