🌟पुर्णा शहरातील रस्त्यांची अवस्था गंभीर : नगर परिषद प्रशासन मुक बधीर...!


🌟शहरील मुख्य रस्त्यांवर जागोजाग पडलेल्या खड्ड्यात साचतय पावसासह नाल्यांतील सांडपाणी🌟


पुर्णा (दि.२७ आगस्ट २०२३) : पुर्णा शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिकांसह आसपासच्या दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शहरातील प्रमुख चौकांना जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला देखील सहन करावा लागत असून या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून वाहन स्पिडने गेल्यास खड्ड्यांतील गलिच्छ पाणी पादचाऱ्यांसह दुकानदारांच्या देखील अंगावर उडून जात आहे.  


पुर्णा शहरातील महात्मा बसवेश्वर चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महर्षी दयानंद सरस्वती चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाला जोडणारा मुख्य रस्ता,डॉ.जाकीर हुसेन चौक परिसर,संत नरहरी महाराज चौकासह लोकमान्य टिळक रोड आदी परिसरांमध्ये अल्पशः कालावधी पुर्वी झालेल्या रस्त्यांवर देखील खड्डे झाल्यामुळे त्यात पाणी साचून याच्या दुष्परिणामांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे परंतु पुर्णा नगर परिषद प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी अक्षरशः मुक बधीर झाल्याचे निदर्शनास येत असून शहर परिसरातील नागरिकांनी निवेदन देऊन सुध्दा त्या निवेदनांची दखल न घेता त्या निवेदनांना केराची टोपली दाखवली जात आहे ज्यामुळे आपत्तीजनक अपघातांचा धोका वाढत असून शाळकरी मुले/मुली दररोज जखमी होत आहेत.शहराच्या आत स्कूटर व मोटारसायकलमुळे अपघात होऊन लोक जखमी देखील होतांना दिसत आहेत......
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या