🌟केंद्र सरकारने चणाडाळीच्या वाढत्या किंमतींनंतर सवलतीच्या दरात चणा डाळ उपलब्ध करून देण्याचा घेतला निर्णय.....!


🌟1 किलो पॅकसाठी 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो याअनुदानित दराने डाळीची विक्री सुरु🌟

✍️ मोहन चौकेकर 

केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशात सवलतीच्या दरात चणा डाळ उपलब्ध करुन दिली आहे. सध्या या चणा डाळीची विक्री सुरु केली आहे. भारत सरकारनं 'भारत डाळ' या नावाने बाजारात डाळीची विक्री सुरु केलीय. 1 किलो पॅकसाठी 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो याअनुदानित दराने डाळीची विक्री सुरु आहे. वाढत्या किमतींनंतर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.  

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली. ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने 17 जुलैला एक किलो पॅकसाठी प्रति किलो 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो या अत्यंत अनुदानित दराने डाळीची विक्री सुरु केली आहे. सरकारनं 'भारत डाळ' या नावाने चणाडाळ विक्रीसाठी बाजारात आणली आहे. 

नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि सफलच्या किरकोळ विक्री केंद्रातून भारत डाळीचे वितरण केले जात आहे. या व्यवस्थेअंतर्गत चणा डाळ राज्य सरकारांना त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलीस, तुरुंग, तसेच राज्य सरकार नियंत्रित सहकारी संस्था आणि महामंडळांच्या किरकोळ दुकानांमधून वितरणासाठी उपलब्ध करून दिली जाते.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या