🌟सोन्याचे नकली दागिणे दाखवून लोकांची फसवणुक करत त्यांना लुटणाऱ्या टोळीस मंगरुळपीर पोलिसांनी केले जेरबंद....!


🌟स्थागुशाने नकली सोन्याचे दागिणे व सहा मोबाईल एकूण किंमत 49820/रुपयांचा मुद्देमाल हस्तगत🌟


फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे सोन्याचे नकली दागिणे विक्री करण्याचे बहाणा करुन लोकांची फसवणुक करणारी टोळी पोस्टे हद्दीत फीरत असल्याबाबतची गोपनीय माहीती पोस्टे चे डी बी पथक यांना मिळाल्याने तसेच सदर सोन्याचे नकली दागिणे विकणारी टोळी ही मंगरुळपीर येथील एका इसमाच्या संपर्कात असून त्यांची फसवणुक करण्याच्या तयारीत असल्याबाबतची गोपनीय माहीती मिळाल्याने डीबी पथक मध्ये कार्यरत असणारे पोउपनि दिनकर राठोड, पोहेकॉ/867 अमोल मुंदे, पोकॉ/1374 मोहम्मद परसुवाले यांनी सदर फसवणुक होणाऱ्या इसमाची माहीती काढून त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, दिनांक 21/08/2023 रोजी दोन इसम शहरातील एका डॉक्टरच्या क्लीनीकमध्ये येवून आम्हाला पैश्याची आवश्यकता असल्याने माझेकडील १ ते १.५ किलो सोन्याचे दागीने तुम्हाला कमी पैश्यामध्ये विकत देतो त्याबाबत मला तुम्ही दोन ते चार लाख रूपये दया असे म्हटले मी त्यास दागीने घेवुन मंगरूळपीर येथे बोलाविले असता तो मला म्हणाला की, मी मंगरूळपीर येथे येतो परंतु तुम्ही कोणालाही काहीही सांगु नका असे सांगीतले.

 परंतु मला पुढील व्यक्तीवर संशय आल्याने मी त्याचेसोबत काहीही बोललो नाही. अशी माहीती दिनांक 24/08/2023 रोजी फसवणुक होणाऱ्या डॉक्टरकडून डीबी पथक यांना मिळाली. सदर माहीती डीबी पथक यांनी आम्हास दिल्याने आम्ही सदर इसमांना पकडण्याकरीता सापळा पथक तयार करण्यात आले.पुन्हा दिनांक 24/08/2023 रोजी सोन्याचे नकली दागिणे दाखवून फसवणुक करणाऱ्या इसमाचा नमुद डॉक्टरांना फोन आल्याने आणि त्यांनी पैसे घेवून डॉक्टर यांना सोने विकत घेण्याकरीता शेलुबाजार येथे बोलाविले.वरुन पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील सपोनि/ निलेश शेंबळे, पोउपनि/दिनकर राठोड, पोहेकॉ/867

अमोल मुंदे, पोकॉ/1374 मोहम्मद परसुवाले, पोकॉ/292 जितेंद्र ठाकरे असे सापळा पथक तयार करुन

शेलुबाजार येथे एका घरी छापा टाकला असता खालील इसम मिळून आले.

१) दिपक हरीलाल परमार वय १८ वर्ष रा.मानेवाडा मंगलदिप नगर नवदुर्गा मंदिर जवळ नागपुर

२) दिनेश नंदु सोलंकी वय २१ वर्ष रा. संतसजन वार्ड रामसागर रोड तिरोडा जि.गोंदीया असे सांगीतले.

3) शंकर रमेश पवार वय ४५ वर्ष रा. संतसजन वार्ड रामसागर रोड तिरोडा जि. गोंदीया,

4) राजु केशराम पवार वय ३९ वर्ष रा. संतसजन वार्ड रेल्वेस्टेशन जवळ रामसागर रोड तिरोडा जि. गोंदीया,

5) नथ्यु मोहनलाल बघेल वय ४२ वर्ष रा. कोलीखाय चौक जोगी ठाणापेठ सदावर्ती मंदीरजवळ उमरेड नागपुर.

6) लक्ष्मण हरी सोळंकी वय ४३ वर्ष रा. महाकाली नगर मानेवाडी नागपुर ह.मु. जुनावाडा संजय गांधी नगर झापटा अहमदाबाद.

त्यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

१) झुंबर हार पिवळ्या रंगाच्या धातुचा चापट मनीचा वजन अंदाजे १.६०० किलोग्रॅम किंमत अंदाजे ३००० / रूपये.

२) झुंबर हार अष्टकोन मनीचा पीवळया रंगाचा धातुचा वजन अंदाजे २.९०० किलो ग्रॅम किंमत अंदाजे

६००० / रूपये.

 ३) झुंबर हार गोल मनीचा पिवळ्या रंगाचा धातुचा ३.१५०/किलो ग्रॅम किंमत अंदाजे ६०००/ रूपये.

४) पिवळ्या रंगाचे धातुची वजन ७० ग्रॅम किंमत १४० / रूपये.

५) विवो कंपणीचा पांढ-या रंगाचा अॅडाईड फोन जुना वापरता मोबाईल किंमत ५०००/ रूपये.

६) एम आय कंपणीचा निळया रंगाचा स्क्रीन फुटलेला अॅडाईड मोबाईल किंमत ३०००/ रूपये.

७) विवो कंपणीचा पांढरट आकाशी रंगाचा ॲडाईड मोबाईल किंमत १००००/ रूपये.

८) रीयलमी कंपणीचा हिरव्या रंगाचा ॲडाईड मोबाईल किंमत १२०००/ रूपये.

९) निळया रंगाचा कार्बन कंपणीचा साधा मोबाईल फोन किंमत १२००/ रूपये.

१०) निळया रंगाचा हिरो कंपणीचा साधा मोबाईल फोन किंमत १२००/ रूपये.

११) नगदी एकुण २२८० / रूपये.

असा एकुण ७७२० किलोग्रॅम वजनाचे पीवळ्या रंगाचे धातुचे दागीने किंमत १५१४०/रूपये. मोबाईल फोन

किंमत ३२४०० / रूपये व नगदी २२८०/असे एकुण ४९८२०/ रूपयेचा मुददेमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आले आणि फीर्यादी यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे अप क्र 632/2023 कलम 420,419,417,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/मल्लीकार्जून वाघमोडे करीत आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग सा., मा अपर पो अधिक्षक भारत तांगडे सा, मा.ऊपविभागिय पोलीस अधीकारी निलीमा आरज मॅ, पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/ निलेश शेंबळे, पोउपनि/दिनकर राठोड, पोहेकॉ/867 अमोल मुंदे, पोकॉ/1374 मोहम्मद परसुवाले,पोकॉ/292 जितेंद्र ठाकरे यांनी पार पाडली.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या