🌟विद्यार्थ्यांनी शालेय शिस्त व आज्ञाधारकता अंगिकारली पाहिजे मान्यवरांचे प्रतिपादन....!


🌟निंबा येथे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा स्कूल बॅग वाटप कार्यक्रम : जि.प.प्राथमिक शाळेच्या १४१ विद्यार्थ्यांना बॅग वाटप🌟


अकोला :- विद्यार्थ्यांनी प्रथम गुरू आईवडील आणि शाळेतील गुरूजण त्यांच्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचा विचार करून भरपूर अभ्यासासोबतच आज्ञाधारकता आणि शालेय व सामाजिक शिस्त अंगीकारली पाहिजे.घरात आई वडील आपल्या संगोपन आणि शैक्षणिक प्रगतीसाठी परिश्रम करतात.त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षकही त्याला घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.त्यांच्या कष्ट आणि त्यागाची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेऊन  समाजाच्या आदराला पात्र ठरले पाहिजे.असे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख ( निंबेकर) व मान्यवरांनी केले.

          लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने निंबा येथील जि.प.प्राथमिक शाळेतील  १४१ विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या स्कूल बॕगचे वाटप करण्यात आले‌.ग्रा.प.सदस्य व सामाजिक नेते गणेश देशमुख तथा शशिकांत राजवैद्य,मंगेश देशमुख,धम्मपाल तायडे,भूषण देशमुख या युवकांनी या कामी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम ठेवण्याचा प्रस्ताव लोकस्वातंत्र्यकडे ठेवला होता.त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात विवेक पारसकर,प्रशांत देशमुख( कृषी विभाग) बॉबी उर्फ पराग लहरिया,के.व्ही. देशमुख,डोंगरगावकर तुषार मंत्री, अरुण अग्रवाल,यांचे आर्थिक योगदान लाभले लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला बाळापूर पंचायत समिती सदस्या सौ.अर्चना देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक,उमेश जाधव ,उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपालजी ढोले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तर लोकस्वातंत्र्य उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार प्रदिप खाडे,मार्गदर्शक तथा साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे अनिरूद्ध देशमुख,माजी पं.स. सदस्या सौ.सत्यभामा गव्हाळे,पोलिस पाटील प्रमोद देशमुख,प्रा.मंदार देशमुख यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी अतिथींना सन्मानपत्र,शाल तथा "महायाग" व "महात्मा" पुस्तके प्रदान करून आणि प्रमुख उपस्थितांचेही यावेळी सत्कार करण्यात आले. 

       सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यच्या सामाजिक उपक्रमांचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे बाबा व छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हारार्पण  करून अभिवादन  करण्यात आले.निंबा व परिसरातील अकाली मृत्यू झालेल्या स्वर्गीय समाजबांधवांना यावेळी सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उमेश जाधव आणि अनिरूद्ध देशमुख यांनी जिल्हा परिषदांच्या शाळा टिकवणे आवश्यक असल्याचे सांगून निंबा शाळेच्या विकासासाठी आवश्यक मदतीचे अभिवचन दिले.

           ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब तायडे यांचे संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमास महेश बोर्डे( सरपंच शिंगोली)उमेश उबाळे ( कारगिल विजेता सैनिक) शहजाद खान,हातरूण ग्रा पं सदस्य रामराव देशमुख,संजय उन्हाळे,गणेश देशमुख,सचिन  खोट्टे, धम्मपाल तायडे,नानासाहेब तायडे,ग्रामसेवक श्रीकृष्ण भराडे,शाळा समितीचे सुनिल तायडे,किशोर बोदडे,नाम हिवसे,दिलीप खूळे,सुषमा तायडे, शिक्षकांमधून मुख्याध्यापक राजेश तायडे,दिलीप सुळे,अमोल कांबळे,कु.चंदा पवार,नागेश सोळंके,गजानन खेळकर,तंटामुक्ती अध्यक्ष राहूल तायडे,पत्रकार बाबाराव वानखेडे,लूकमान शाह प्रामुख्याने उपस्थित होते.

  गावातील ग्रामस्थांमधून पुरूषोत्तम सोनोने,भारत पहूरकर,निरंजन तायडे,सुभाष डाबेराव,शेख ईम्रान,सैय्यद आरिफ,गोपाल राठोड,बुधसिंग डाबेराव, शिवाजी तायडे,किरण तायडे,अक्षय तायडे,भूषण देशमुख,अमोल आखूड,अनिल तायडे,निलेश तायडे,मंगेश देशमुख,संदिप देशमुख,प्रकाश नेमाडे,गणेश मेसरे,विनोद तायडे,,श्रीकृष्ण आखूड,दिपक तायडे,रवि तायडे, आदी अनेक गावकरी उपस्थित होते.आभारप्रदर्शन नानासाहेब तायडे व मुख्याध्यापक राजेश तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश देशमुख,मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग व शाळा समिती  तथा अनेक युवकांनी परिश्रम घेतले.....

=========================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या