🌟पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील विदयार्थ्यांचें आंतरमहाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत यश....!


🌟या स्पर्धेत अंजली कुऱ्हे,शुभांगी कदम,शितल कदम,दिव्या कदम,वैशाली पारवे यानी सहभाग घेतला🌟

पुर्णा (दि.०९ आगस्ट २०२३) - पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील विदयार्थ्यांचें आंतरमहाविद्यालयीन 'ड'झोन योगासन क्रीडा स्पर्धा नागनाथ महाविद्यालय औंढा नागनाथ जि. हिंगोली येथे संपन्न झाली, या स्पर्धेत 6 मुलींच्या संघानी स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता.

पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला असून या स्पर्धेत अंजली ज्ञानेश्वर कुऱ्हे , शुभांगी विलास कदम, शितल गणपती कदम, दिव्या दीपक कदम, वैशाली एकनाथ पारवे यानी सहभाग घेतला होता त्यांना मार्गदर्शन प्रा. बरकुंटे यांनी केले  होते. स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल  संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री प्रमोदअण्णा एकलारे, सचिव मा. श्री अमृतराज कदम, कोषाध्यक्ष मा. श्री उत्तमरावजी कदम, सहसचिव मा. गोविंदराव कदम प्राचार्य डॉ. के. राजकुमार उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर व शिवसांब  कापसे कार्यालयीन अधीक्षक श्री बाळासाहेब कुलकर्णी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिकक्षेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांचें अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या