🌟प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा देताच शिक्षण विभाग खडबडून जागे.....!


🌟पाथरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुख्याध्यापकांची तातडीने बदली🌟


परभणी - परभणी तालुक्यातील पाथरा येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापक हे सतत दारूच्या नशेत असून शाळेवर सेवा बजावत असताना देखील ते दारूचे व्यसन करतात तसेच याच शाळेतील महिला शिक्षिका शाळेच्या वेळेत वर्गाबाहेर बसून मोबाईल वर व्यस्त असतात त्या मुळे गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा जिल्हा परिषद प्राथमिक चे शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नव्हती.


याबाबत प्रहार जनशक्ती पक्ष व पाथरा गावातील ७५ पालक व नागरिकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ रोजी तक्रार देऊन संबंधित मुख्याध्यापकांची पाथरा येथील शाळेवरून इतर ठिकाणी तात्काळ बदली करावी तसेच शाळेवर मोबाईल वापरणाऱ्या महिला शिक्षकांना समज द्यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक विभागाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिला होता.


या निवेदनाची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री शिंदे साहेब यांनी तात्काळ दखल घेत शिक्षण विभागाच्या पिंगळी येथील केंद्रप्रमुख यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते या प्रकरणी चौकशी अहवाला नुसार प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे सिद्ध झाल्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या आदेशाने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. नरवाडे यांनी दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी पाथरा येथील मुख्याध्यापकांच्या बदलीचे आदेश काढून तालुक्यातील झाडगाव येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनवणे यांची पाथरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे व या बाबत लेखी आदेश पण काढले तसेच पाथरा येथील शाळेवरील महिला शिक्षकांना शाळेच्या वेळेत मोबाईल न वापरण्याची सत्ता ताकीदही देण्यात आली आहे.

वरील कारवाईमुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश मिळाले असून पाथरा येथील गावकऱ्यांनी व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत.निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शहर चिटणीस वैभव संघई, दिपक भुस, शालेय समिती अध्यक्ष सय्यद अनिस, उपाध्यक्ष मुंजाजी काकडे, अंगद शिंदे, सोपान शिंदे, सय्यद रफिक, नारायण गरुड, शेख जाफर, प्रल्हाद परय इत्यादी सह ७५ पालक व गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या