🌟पुर्णा येथील बुद्ध विहारात श्रावण (निज) पौर्णिमे निमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन.....!


🌟कार्यक्रमास उपासक/उपासिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान बुद्ध विहार समितीच्या वतीने करण्यात आले🌟 

पुर्णा (दि.२८ आगस्ट २०२३) - पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्राचे महासचिव भदांत डॉ उपगुप्त महास्तवीर भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी श्रावण (निज) पौर्णिमे निमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडेपाच वाजता त्रिशरण अष्टशील पूजा पाठ परित्राण  व सूत्र पठण पूजनीय भिकू संघाच्या उपस्थितीमध्ये घेण्यात येणार आहे.

यानंतर दुपारी १२.३० वाजता सामुदायिक वंदना पूजा पाठ व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रमुख अतिथी म्हणून पूर्णा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी युवराज पोळ महावितरण चे उपकार्यकारी अधिकारी निलेश उईके  शहर अभियंता मंगेश खरगे अभिनव विद्या विहार प्रशालेचे मुख्याध्यापक सत्यनारायण रणवीर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमांमध्ये संतोष सोनसळे ( महाराष्ट्र पोलीस नांदेड ) यांनी काश्मीर ते कन्याकुमारी रेस आक्रॉस इंडिया अंतर 3641 किमी.  सायकलिंग स्पर्धेमध्ये देश पातळीवर द्वितीय क्रमांक आल्याबद्दल त्यांचा बुद्धविहार समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.या प्रसंगी संगीता सिताराम नगारे यांच्याकडून भिक्खू संघास चिवरदन फलदान उपस्थितास खीर दान करण्यात येणार आहे. वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या