🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात पावसाचा खंड : सोयाबीन,कापुसाने माना टाकल्या....!


🌟तर ऊसाचे पिक ही वाळू लागले : शेतकरी पुत्रांचा विम्या साठी सोशल मिडियातून आक्रोश🌟


परभणी (दि.१७ आगस्ट २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात या वर्षी मानसून लहरी पणे बरसला काही ठिकाणी पेरण्या उरकल्या तर काही ठिकाणी २२ जुलैच्या रिपरिपी वर दुबार पेरण्या कराव्या लागल्या. २२ जुलै पासुन पाथरी शहर आणि परिसर वगळता तालुक्या कुठेच पावसाचा साधा शिडकाव ही न झाल्याने जमिनीवर रांगत असलेलेले सोयाबीन आणि कापसाचे पिक माना टाकून करपत आहे तर ऊस ही पाण्या अभावी वाळून जात असल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.


पाथरी तालुक्यात चार महसुल मंडळे आहेत पाथरी सह कासापुरी, हादगाव, बाभळगाव ही महसुल मंडळे आहेत. या वर्षी ऊशिराने वरुन राजाचे आगमन झाले खरे परंतु तो तालुक्यात लहरी पणे बरसला. यात कान्सूर,बाभळगाव,तारुगव्हाण,डाकुपिंप्री,वाघाळा.लिंबा,फुलारवाडी,बनई,विटा,मुदगल या भागात २२ जुलैच्या रिपरीप पावसावर दुबार पेरणी झाली खरी मात्र तेव्हा पासुन या भागात पावसाने दडी मारली आहे. या भागात पावसाच्या खंडाला पंचविस दिवसावर वेळ झाला असून पाथरी शहर आणि परिसरात २९ जुलै रोजी पाऊस पडल्याची नोंद तहसीलच्या लेखी आहे. त्या मुळे १९,२० दिवसाचा खंड सांगितला जात असला तरी परिस्थिती मात्र वेगळी आहे.सोयाबीन चे पिक करपुन जात आहे.तर कापुस ही दिस पुरवल्या गत दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिण्याचा कालावधी लोटला तरी पाऊन नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांच्या कडे पाणी आहे असे शेतकरी रात्रीचा दिवस करत पाणी पाळी देत आहेत.मात्र अनेकांचे पाणी साठे आटत आल्याने ते शेतकरीही हताश झाल्याचे पहावयास मिळत आहे.

पावसाचा अनेक दिवसाचा खंड ऊत्पादन घटीत होणार आहे. वाघाळा येथील कल्याण सवने या शेतक-याने तर अडीच एकरातील सोयाबीन पिकावर रोटारेटर चालऊन पुढील रब्बी पिकाची आशा करत शेत दुरूस्त केले आहे.या सर्व प्रकाराचा ट्रेंड शेतकरी पुत्र सोशल मिडीयातुन चालवत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्या साठी आक्रोश करतांना दिसत आहेत.पाथरी तालुक्यातील पावसाच्या खंडामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून या साठी आता जिल्हाधिकारी यांच्या कडे राजकीय मंडळींनी पाठपुरावा करून अॅग्रिम विमा मिळऊन देण्या साठी राजकीय पुढा-यांनी इच्छा शक्ती खर्च करण्याची मागणी ही शेतकरी पुत्र सोशल मिडियातून करत आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या