🌟परभणीत आयोजित 'शासन आपल्या दारी' योजनेच्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद....!


🌟सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांचे जिवनमान उंचवावे या दृष्टीने राज्य सरकारद्वारे सर्वतोपरी भक्कम असे प्रयत्न सुरु - मुख्यमंत्री 

परभणी (दि.२७ आगस्ट २०२३) : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील नागरिकांसह महिला अबाल वृध्दांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी बोलतांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील सर्वसामान्यांसह शेतकरी शेतमजूर रोजमजूरांचे जिवनमान उंचवावे या दृष्टीने राज्यातील राज्य सरकार सर्वतोपरी भक्कम असे प्रयत्न करीत आहे त्याचे चांगले परिणामसुध्दा निश्‍चितच दिसून येत आहेत. भविष्यातसुध्दा हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताकरीता क्रांतीकारी असे निर्णय घेईल प्रभावीपणे अंमलबजावनी करेल असा ठाम विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवार दि.२७ आगस्ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रांगणात ‘शासन आपल्या दारी’ हा परभणी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील,पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर,जिंतूर/सेलूच्या आमदार सौ.मेघना साकोरे बोर्डीकर,गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विप्लव बाजोरीया, माजी मंत्री अर्जून खोतकर,माजी खासदार तथा शिवसेना परभणी जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश जाधव,शिवसेना परभणी जिल्हा सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे,माजी मंत्री गणेशराव दुधगावकर,आमदार बालाजी कल्याणकर,माजी आमदार हरिभाऊ लहाणे,माजी आमदार मोहन फड,भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महानगर जिल्हाध्यक्ष देशमुख,शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रविण देशमुख, जिल्हाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेनेचे नेते सईद खान, कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, विभागीय महसुल अधिकारी मधुकर आर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, महापालिका आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे आदी आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थिती होती.

* ‘शासन आपल्या दारी’ ही क्रांतीकारी योजना :-

         याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणातून, शासन आपल्या दारी ही योजना क्रांतीकारी ठरली आहे, असे स्पष्ट करीत या योजनेतून त्या त्या जिल्ह्यांमध्ये विविध विभागांमार्फत योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने सर्वार्थाने प्रयत्न केले जात आहेत. त्यातून निश्‍चितच चांगले परिवर्तन दिसून येत आहे. लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावरील समाधान व आनंद निश्‍चितच आनंद देणारा ठरतो आहे. या योजनेचे सारे श्रेय सरकारी यंत्रणांचे, लोकप्रतिनिधींचे आहे. त्यांचे भक्कम असे आशिर्वाद हे सरकारला बळ देणारे आहे, असे ते म्हणाले. या योजनेतून 22 हजारांवर ट्रॅक्टर 4 हजारांवर पॉवर टिलर, 22 हजार 500 च्या वर रोटावेटर वितरीत करण्यात आले असून 1 हजार 351 कोटी रुपये कृषि क्षेत्रावर खर्च झाले आहेत, असे ते म्हणाले.

* विरोधक स्वार्थाची खिचडी पकविण्यात मग्न :-

        13 एप्रिल रोजी पाटणमधून या योजनेचा शुभारंभ झाला. 1 कोटी 40 लाख लाभार्थ्यांपर्यंत सरकारने लाभ पोहोचवला. त्यावेळी पाटण्यात विरोधक स्वार्थीपणातून खिचडी पकवण्यात मग्न होते, असा टोला लावून शिंदे लावला.

* अजितदादांमुळे आणखीन ताकद :-

            राज्य सरकारने राजकारणाऐवजी काम करण्यावर, पुढे चालण्यावर मोठा भर दिला आहे. केंद्र सरकारचे मोठे पाठबळ मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारख्या कार्यकुशल, दृष्ट्या नेतृत्वामुळे योजना जलदगतीने मार्गी लागत आहेत. परीवर्तनाची मोठी लाट सर्वदूर, सर्वक्षेत्रात दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींच्या प्रभावी नेतृत्वासह  विकासाच्या मुद्यावरच सरकार पाठींबा दिला. त्यामुळे राज्य सरकार अधिक ताकदीने कार्यरत झाले आहे, असे ते म्हणाले.

* आधीच्या सरकारला करंट देवून लाईनवर आणले :-

         याआधीचे सरकार ऑनलाईन कारभार घरातून पाहत होते. ऑनलाईनवरचे हे सरकार आम्हीच करंट देवून लाईनवर आणले, असा टोला देवून मुख्यमंत्री यांनी आम्ही कामस महत्व देणारे आहोत, असे नमूद केले. विरोधकांनी सकाळपासून रात्रीपर्यंत कितीही भोंगे लावावेत, शिव्याशाप द्यावा परंतु, त्याचा परिणाम आमच्या वाटचालीवर होणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला. विरोधकांद्वारे सरकार पडणार अशा वावड्याही उठविण्यात आल्या. सरकार तर पडले नाही, उलट ताकदीने उभे राहीले, नव्हे अजितदादा यांच्या सहभागाने हे सरकार आणखीनच ताकदवान झाले, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आता मुख्यमंत्री बदलणार अशा वावड्या उठविल्या जात आहेत. सर्वसामान्यांच्या कुटूंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याचे विरोधकांच्या पचनीच पडत नाही, हे दुर्देव आहे, असा टोला लावून विरोधकांचा हा जळफळाट आणि भिती सर्वसामान्यांनी ओळखली आहे, असे शिंदे यांनी म्हटले.

* परभणीतील रस्ते चकाचक करु :-

          जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे एक रुढ वाक्य झाले आहे. परंतु, हे सरकार पुणे, मुंबईपुरताच विकास मर्यादित ठेवणार नाही, विकासाची गंगा निश्‍चितपणे चांद्यापासून बांध्यापर्यंत पोहचवेल, असा विश्‍वास करतेवेळी शिंदे यांनी परभणी शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांचा संवेदनशील असा विषय निश्‍चितपणे मार्गी लावू, सिमेंटचे रस्ते तयार करु, त्यासाठी आवश्यक निधी देवू, सर्व रस्ते चकाचक करु, त्यासाठी 70 कोटी 21 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवू, असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

* भूमीगत गटारे व नाट्यगृह मार्गी लावू :-

           अमृत योजनेतून भुयारी गटार योजनेस 400 कोटी, पाणी पुरवठा योजनेकरीता आवश्यक तेवढा निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. परभणीतील रखडलेल्या नाट्यगृहाचा प्रश्‍नदेखील मार्गी लावू, समृध्दी महामार्गाचा विषयही निश्‍चितच हाताळू, असा विश्‍वाही व्यक्त केला. सेलूतील एमआयडीसीचा प्रश्‍नही मार्गी लावू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या