🌟स्टुडंट पोलिस कॅडेट कार्यक्रमा अंतर्गत सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश शेंबडे यांचे मार्गदर्शन....!


🌟तसेच त्यांनी सायबर गुन्ह्यांविषयी देखील विद्यार्थांना अवगत केले🌟

✍🏻फुलचंद भगत

मंगरुळपीर:- स्थानिक जि.प.माध्यमिक विद्यालय येथे केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत राष्ट्रीय स्तरावर स्टुडंट पोलीस कॅडेट (एस.पी.सी.) कार्यक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर राबविला जात आहे.महाराष्ट्रातही ९०० हून अधिक शाळांमध्ये इयत्ता ८वी , ९वी चे ८०,००० हून अधिक विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयात शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेम अशा नितीमुल्यांच्या जडणघडणीसाठी उपयुक्त आहे.तसेच विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची जवळून ओळख व्हावी या उद्देशाने मंगरुळपीर चे ए.पि.आय.निलेश शेंबडे यांनी विद्यार्थ्यांना व्हाट्सअप , फेसबुक , ट्विटर, इंस्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीशी चॅटींग करु नये. तसेच अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारण्यात येऊ नये.ह्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्ह्यांविषयी अवगत केले. रहदारीच्या बेशिस्तीमुळे होणाऱ्या अपघातांची जाणिव करुन देवून रहदारीच्या नियमांचे काटेकोरपणे कसे पालन करावे याबाबत अधिक माहिती दिली.व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ह्या वेळी एस.पी.ऑफीस वाशिम वरून आलेले कवायत निर्देशक मो.मौसिक शेख साहेब यांनी विद्यार्थ्यांना कवायत ड्रील विषयी माहिती दिली व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक राऊत सर यांनी केले तर कार्यक्रमाला प्राचार्य एस.पी.टिक्कस, व्हि.पी.बाबरे, मो.मौसिक शेख साहेब,किरण पाटील, मो.मोहसीन, सचिन मांढरे, वसंत सोनोने आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या