🌟परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगर परिषद प्रशासनाकडून रोजंदारी कामगारांना हक्काचे वेतन देण्यास टाळाटाळ....!


🌟रोजंदारी कामगारांना मागील पाच महिन्यांपासून वेतन नाही : कामगारांनी कामबंद आंदोलन केल्याने पाणीपुरवठा बंद🌟

सोनपेठ (दि.३० आगस्ट २०२३) सोनपेठ नगर परिषद प्रशासनाने रोजंदारी कामगारांना मागील ५ महिन्यांपासून हक्काचे वेतन देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने संबंधित रोजंदारी कामगार वेतना अभावी त्र झाले असून अनेक कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

नगर परिषद प्रशासनाकडून हक्काचे वेतनच मिळत नसल्यामुळे रोजंदारी कामगारांनी आज बुधवार दि.३० आगस्ट रोजी 'वेतन नाही तर काम नाही' असा नारा देत पानी पुरवठा व विद्तुत पुरवठा बंद केल्याचे समजते कामगार पेमेंट माघायला गेले असता त्यांना आज देतो उद्या देतो म्हणून मागील २० दिवसापासून फिरवले जात असल्यामुळे काम करुण घेऊन त्या बिचाऱ्या कामगारांनाच भिक मगितल्या सारखे अधिकाऱ्यांच्या माघे फिरावे लागत आहे काल मंगळवार दि.२९ आगस्ट २०२३ रोजी संबंधित रोजंदारी कामगार नगर पालिके मध्ये वेतन मागण्यासाठी गेले असता ऑफिस मधील एका परमानेंट कर्माचार्याने मुख्याधिकाऱ्यांना कॉल केला असता मुख्याधिकारी म्हणाल्या की त्यांना काढून दूसरे रोजंदारी कामगार लावा त्यामुळे संबंधीत कामगार संतप्त झाले व त्यांनी आज काम बंद आंदोलनाला सुरुवात केल्याचे समजते..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या