🌟राज्यातील 50 हजार गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण देण्याचा राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय.....!


🌟यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे🌟

✍️ मोहन चौकेकर 

राज्यात दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीग दरम्यान तब्बल 50 हजार गोविंदांना विमाकवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. या निर्णयानुसार गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्यात येतील. तसेच, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे.

यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीची निवड करण्यात आली असून त्यासाठी 37 लाख 50 हजार रुपयांचा निधी दहीहंडी समन्वय समितीला वितरित करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. 50 हजार गोविंदाना प्रतिगोविंदा 75 रुपये विमाहप्ता याप्रमाणे 37 लाख 50 हजार रुपयांचा निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

या निर्णयानुसार अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, दोन अवयव किंवा दोन डोळ गमावल्यास 10 लाख, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास 5 लाख, कायमस्वरूपी पूर्ण अंपगत्व आल्यास 10 लाख, कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व असल्यास विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या टक्केवारीनुसार मदत करण्यात येईल. 50 हजार गोविंदांचा विमा उतरवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे दहीहंडी समन्वय समिती स्वागत करत आहे.                                                  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या