🌟परभणी जिल्ह्यातील 41 मंडळात पिकांचे होणार सर्वेक्षण....!




🌟जिल्हाधिकारी रघुनाथ यांनी दिली माहिती🌟

परभणी (दि.31आगस्ट 2023) : परभणी जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या पार्श्‍वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम लागू करण्याकरीता जिल्ह्यातील 41 महसूल मंडळातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी व राज्य शासनाच्या अधिकार्‍यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काल बुधवार दि.30 आगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी रघंनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुका कृषि अधिकार्‍यांसह सर्व निमंत्रित सदस्यांची उपस्थिती  होती. जिल्ह्यात 28 जूलै ते 19 ऑगस्ट दरम्यान पावसात खंड पडला. परिणामी सोयाबीन, कापूस व तूर या पिकांचे हलक्या व मध्यम जमिनीवरील पीके सुकून गेल्यामुळे त्यामध्ये काहीच उत्पन्न येणार नसून भारी जमिनीवर असलेल्या पिकांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट येईल, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळातील पिके जळून गेल्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या बाबी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या असून पिक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनीही 50 या पीकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट होईल, असे सांगितले असून जिल्ह्यातील 41 महसूल मंडळात अशीच परिस्थिती आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी नमूद केले. 

           या 41 महसूल मंडळातील पिकांचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई ठरविण्याकरीता विमा कंपनीचे प्रतिनिधी व राज्य शासनाच्या अधिकार्‍यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये संबंधित मंडळाचे कृषि अधिकारी हे समितीचे अध्यक्ष असतील तर विमा प्रतिनिधी (आयसीआयसीआय लोम्बार्ड), तलाठी, कृषि सहाय्यक, कृषी विद्यापीठ/कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व शेतकरी हे सर्व या समितीत सदस्य असतील, असे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले. या समितीचे सनियंत्रण आदेश निमर्गमित करुन त्यांचे सनियंत्रण करावे व 6 सप्टेंबर 2023 पर्यंत सोबत दिलेल्या प्रपत्रात नुकसानीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा, असे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

          या समितीने अधिसूचित पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी 5 टक्के क्षेत्राचे नजरअंदाज सर्वेक्षण करुन नुकसानीचे मूल्यमापन करावे. सदरच्या सर्व विमा क्षेत्र घटकातील रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या 10 वेगवेगळ्या ठिकाणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार संयुक्त समितीने अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांच्या रॅन्डम पध्दतीने प्रत्येक महसूल मंडळातील 10 वेगवेगळी ठिकाणे निवडून त्या ठिकाणच्या पिकांची पाहणी करुन महसूल मंडळनिहाय पिकांच्या नुकसानीची टक्केवारी निश्‍चित करावी, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

* या महसूलमंडळांचा समावेश :-

         जिल्ह्यातील 41 महसूल मंडळात पीकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई ठरविण्यात येणार आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील परभणी, झरी, जांब, पेडगाव, टाकळी, पिंगळी व परभणी ग्रामीण, पाथरी तालुक्यातील हादगाव बु. व कासापुरी, जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा, बाम्हणी, दुधगाव, वाघी, धानोरा, बोरी, आडगाव व चारठाणा, पूर्णा तालुक्यातील पूर्णा, कात्नेश्‍वर, चुडावा व कावलगाव, पालम तालुक्यातील पालम, चाटोरी व बनवस, सेलू तालुक्यातील वालूर, कुपटा, देऊळगावगात, चिखलठाणा बु. व मोरेगाव, मानवत तालुक्यातील मानवत, कोल्हा, रामपुरी बु. व ताडबोरगाव, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व पिंपळदरी तर सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, आवलगाव, शेळगाव व वडगाव या 41 महसूल मंडळांचा समावेश असणाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या