🌟पालम तालुक्यातून परभणीतील "शासन आपल्या दारी" महामेळाव्यासाठी 33 बसेस जाणार....!


🌟या मेळाव्यास जाण्यासाठी सर्व लाभार्थ्याच्या प्रवास व भोजनाची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येणार🌟 

पालम : महाराष्ट्र शासनाकडुन विविध योजना देण्यासाठी "शासन आपल्या दारी" उपक्रमाचे आयोजन विविध स्तरावर करण्यात येत आहे येत्या रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३ रोजि परभणी येथे वसतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात हा महामेळावा आयोजीत करण्यात येत असून या मेळाव्यास मा. ना. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मा.ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. ना. उपमुख्यमंत्री अजित पवार इ. मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यास जाण्यासाठी सर्व लाभार्थ्याच्या प्रवास व भोजनाची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येणार असून, पालम तालुक्याला एकुण 33 बसेस (एस.टी.) राज्य परिवहन मंडळाकडुन पुरविण्यात येणार आहेत. या प्रत्येक बस मध्ये 40 लाभार्थी मेळाव्याला जाणार आहेत. या 33 बसपैकी 07 बसेस नगर पंचायत हद्दीतील लाभार्थी तर 25 बसेस ग्रामीण भागातील लाभाथ्र्यांसाड़ी देण्यात येणार आहेत. या सर्व बसेस सजाच्या मुख्यालयाच्या गावातून सोडण्यात येणार आहेत.

बसमध्ये 40 लाभार्थी नेण्यासाठी आणण्यासाठी जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी, महिला बचत गट यांच्यावर सोपविण्यात आली आहे.या सर्व लाभार्थ्याची चहा, नाश्ता, जेवणाची सुवीधा देण्यात येणार आहे. या मेळाव्यास हजारो लाभार्थी सहभागी व्हावेत असे अहवान तहसिलदार कैलाशचंद्र वाघमारे, गट विकास अधिकारी उदय शिसोदे, मुख्याधिकारी संतोष लोमटे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, वैदयकिय अधिक्षक डॉ. खंदारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालीदास निरस यांने अव्हान केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या