💥पाकिस्तानात मोठा रेल्वे अपघात : रावळपिंडीला जाणारी हजारा एक्स्प्रेस उलटली....!


💥भयंकर अपघातात 22 ठार 80 जखमी💥

पाकिस्तानमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे.  रावळपिंडीहून धावणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले.या अपघातात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर किमान 80 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ट्रेनमध्ये प्रवासी मोठ्या संख्येने असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.  कराचीपासून 275 किमी अंतरावर नवाबशाहमधील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.हे स्थानक शहजादपूर आणि नवाबशहा दरम्यान आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या