🌟प्रमोद अंभोरे यांना "महाराष्ट्र गौरव पुरस्कार - 2023" जाहीर....!


🌟या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांनी केले🌟

परभणी (दि.२१ आगस्ट २०२३) - परभणी शहरातील अविरत शैक्षणिक कार्य करणारी शैक्षणिक संस्था माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी संचलित माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह व शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गोर, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून शिक्षणाच्या प्रवाहात आण्यास मदत, परभणी शहरातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी 'समाजहित मोफत कोचिंग क्लासेस' चालवून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करणारे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत करणारे, अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून शैक्षणिक कार्य करणारे, वेळोवेळी रुग्णांना मदत, रुग्णांना रक्तदान व रक्त उपलब्ध करून देण्यात मदत करून रुग्णहितार्थ कार्य करणारे, परभणी जिल्ह्यात भिक्षा मुक्त परभणी अभियान राबवून शहरातील भिक्षा वृत्ती करणाऱ्या लोकांना भिक्षा पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारे, तसेच कोरोना काळात आनेक गरजूना मदत, गरजू, निराधार लोकांना अन्नदान, भिक्षावृत्ती करणाऱ्या, गरजू महिलांना साड्यांचे वाटप, निराधारांना थंडी पासून वाचवण्यासाठी रग देऊन मदत करणारे, व दै./ सा. बंड व समाजहित न्यूज चॅनलच्या माध्यमातून गोर, गरिब, गरजू च्या व्यथा प्रखर पने मांडून अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे, तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अंतर्गत पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे, शहरात सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहेत. प्रमोद अशोकराव अंभोरे यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्था, परभणी यांच्या वतीने निवड पत्र देऊन "महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023" जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 27 ऑगस्ट रोजी सत्येश्र्वर हॉल, मेघे बोरगाव वर्धा येथे मा. खा. रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांनी केले आहे. या सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष इंजि. आर.डी.मगर,  पुरस्कार निवड समिति अध्यक्ष मो.इलियास कच्छी हे आहेत तर स्वागताध्यक्ष मोहनराव मोहिते असणार आहेत सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या