🌟कु.श्रेयश सुभाषराव अंभोरे याची 11 व्या राष्ट्रीय स्तर कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी निवड....!


🌟सदर स्पर्धा ही दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई मुलुंड येथे घेतली जाणार आहे🌟

डोंबिवली :- मुळचे दुधगाव तालुका जिंतुर जिल्हा परभणी येथील कालवश अशोक बाबाराव अंभोरे यांचे नातु, ॲड. सुभाष अशोकराव अंभोरे यांचे चिरंजीव कु. श्रेयश सुभाषराव अंभोरे याची वर्ल्ड शोटोकन कराटे ऑर्गनायझेशन यांनी आयोजीत केलेल्या 11 व्या राष्ट्रस्तरीय कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धसाठी डोंबिवली ठाणे, महाराष्ट्रातुन निवड झाली आहे. सदर स्पर्धा ही दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई मुलुंड येथे घेतली जाणार आहे.  कु.श्रेयस अंभोरे हा माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले डोंबिवली शहर उपाध्यक्ष तसेच समाजहित न्यूज चे कार्यकारी संपादक  ॲड. सुभाष अंभोरे यांचे चिरंजीव आहे. कु. श्रेयश अंभोरे ची निवड झल्याबद्दल पालक व कुटुंबियांकडून, नातेवाईक तसेच सर्वच स्तरातून त्याच कौतुक केले जात आहे. कु.श्रेयश या स्पर्धेत नक्कीच सुवर्ण पदक पटकावेल अशी अपेक्षा व विश्वास ॲड. सुभाष अंभोरे यांनी व्यक्त केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या