🌟आता फळबागांच्या खतासाठी 100 टक्के अनुदान मिळणार -- कृषिमंत्री धनंजय मुंडे


🌟‘स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ अंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

 फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ अंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.


याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. या योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

तसेच राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहित  दिली आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या