🌟भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100% अनुदान मिळणार - धनंजय मुंडे


🌟100 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद, आवश्यकता वाटल्यास तरतूद वाढविणार जयंती दिनी मुंडे यांनी केली घोषणा🌟

मुंबई (दि.21 आगस्ट 2023) - महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे. 

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे. राज्य सरकारने 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यांतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100% अनुदान देते. 

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100% अनुदान दिले जाणार आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या