🌟पुर्णा तालुक्यातल्या छावाची डरकाळी अन् प्रहारचा दणका अखेर कुंभकर्णी झोपेतल्या सा.बां.विभागाला आली का जाग ?


🌟तालुक्यातील कावलगाव-लोहा-नांदेड मार्गावरील गोदावरी नदीवरील खडकी पुलालगतचा पर्यायी रस्ता ठरतोय धोकादायक🌟


पुर्णा (दि.३० जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अकार्यक्षम व कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणारी काही कामे अर्धवट तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास दिसत असून मर्जीतील भ्रष्ट गुत्तेदारांशी हात मिळवणी करुन स्वतःचे हात ओले करून घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या प्रचंड त्रासाची यत्किंचितही जाणीव नसल्याचे पाहावयास मिळत आहे असाच एक गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला असून पुर्णा तालुक्यातील कावलगाव-कावलगाव वाडी-धानोरा मोत्या-रुंज-सातेफळ-पेनुर-लोहा-नांदेड या मार्गावरील पुर्णा नदीपात्रावरील अंदाजे ०४ कोटी रुपयांच्या विकासनिधीतून नव्याने बांधण्यात आलेल्या खडकी पुलालगतच्या पर्यायी रस्त्याची झालेली दुर्दैवी अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षम कारभाराची साक्ष देत आहे.


पुर्णा तालुक्यातील कावलगाव-लोहा-नांदेड या मार्गावरील गोदावरी नदीपात्रावरील खडकी पुलाचे बांधकामाचे कंत्राट 'पल्लवी कन्स्ट्रक्शन' या संस्थेला देण्यात आले होते या पुलासह आसपासच्या कावलगाव,कावलगाव वाडी,पेनूर,धानोरा मोत्या,रुंज,सातेफळ,चांगेफळ,पिंपरण,कलमुला या गावातील लोकांना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता देखील तयार करणे पल्लवी कन्स्ट्रक्शन या संस्थेने तयार करणे आवश्यक होते परंतु संबंधित कंत्राटदार संस्थेने अत्यावश्यक असलेल्या या पर्यायी रस्त्याची निर्मिती केलीच नाही या संदर्भात कावलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल भारतीय छावा युवा जिल्हाध्यक्ष गजानन सवराते यांनी २७ जुन २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीचे कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी केली होती यावेळी त्यांनी या पर्यायी रस्त्याचा तब्बल दहा गावांतील नागरिकांसह शाळा/महाविद्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थांना परिसरातील शेतकऱ्यांना देखील उपयोग होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले कारण आलेगाव पिंपरन पिंपळा भत्या येथील जय जवान जय किसान माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात येणारे या गावांतील विद्यार्थी कावलगावला शाळेत येत असतात परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने कंत्राटदाराच्या हितसंबंधापोटी तात्काळ उपाययोजना न करता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली.


यानंतर पुन्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णा कार्यालयातील उपविभागीय अभियंता सुनिल मोरलवार यांच्याशी दि.२८ जुलै २०२३ रोजी संपर्क साधून लेखी स्वरुपात निवेदन देऊन त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रथमतः परभणी जिल्हा अखिल भारतीय छावा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष गजानन सवराते या छाव्याने जनहीतास्तव मारलेला शाब्दीक पंचा व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी केलेला प्रहार निश्चितच कुंभकर्णी झोपेतून जागवण्यास कारणीभूत ठरेल व या पर्यायी रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात प्रहार जनशक्तीच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णाचे अकार्यक्षम अधिकारी खडखडून जागे झाले असल्याचे बोलले जात असून या कामासाठी कंत्राटदार पल्लवी कन्स्ट्रक्शन परभणी या संस्थेने साहित्य मागवले असल्याचे समझते...... 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या