🌟नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये रोटेगाव रेल्वे स्टेशनला मोबाईल चोरी : रेल्वे सेना टिमने चोरट्याचा पाठलाग करून मोबाईल मिळवला...!


🌟रेल्वे सेना टिम सदस्य सिकंदर शेख व सोनू आरेफ शेख यांची कौतुकास्पद कामगिरी : प्रवास्याने मानले आभार🌟

माहिती मिळताच चोराचा भरपावसात मध्यरात्री रेल्वे सेना टीम सदस्य सिकंदर शेख व सोनू शेख ने पाटलाग केला मोबाईल मिळाला पण चोर अंधाराचा फायदा घेऊन हाती लागला नाही शंकर कलापाड राह वाशिम हे मुंबई हुन पूर्णा मार्गे वाशिम ला नातेवाईक सह S 3 कोच मध्ये प्रवास करताना हा प्रकार घडला घटनेची माहिती प्रवासी यांनी छ संभाजीनगर रेल्वे पोलीस ठाणे येथे हजर झाले व दिली रेल्वे पोलीस ठाणे संभाजीनगर यांनी तातडीने रोटेगाव येथील रेल्वे सेना टीम ला घटनेची माहिती दिली पाऊस पडत असल्याने चोर ब्रिज खाली अंधारात लपलेला आहे असे लक्षात येताच त्यांनी त्याचा पाटलाग केला.

हा प्रकार रात्री उशिरा 00: 00 ते 01:00 चालला काल दि.06 जुलै 2023 रोजी सकाळी रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी व रेल्वे पोलीस चर्चा होऊन मूळ प्रवासी यास सकाळी रोटेगाव रेल्वे स्टेशन येथे स्टेशन मास्टर मीना रेल्वे सेना टीम सदस्य सिकंदर शेख व सोनू आरेफ शेख यांनी परत केला रेल्वे सेना टीम व रेल्वे पोलीस ठाणे यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या