🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांचा महारोजगार मेळावा संपन्न....!


🌟मेळाव्यात राज्यातील 15 नामांकीत मोठे उद्योजक, कंपन्या उपस्थित होत्या🌟


परभणी (दि.14 जुलै 2023) : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींसाठी खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्ष व जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 14 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा श्री.मंगलकार्यालय स्टेशन रोड परभणी येथे संपन्न झाला.


मेळाव्यात राज्यातील 15 नामांकीत मोठे उद्योजक, कंपन्या उपस्थित होत्या. या ठिकाणी जिल्ह्यातील सुशिक्षित उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थित एकूण 475 सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांपैकी उद्योजक, कंपन्या यांनी  194 उमेदवारांची निवड केलेली आहे.

तसेच जिल्हा उद्योग केंद्र, एस.बी.आय.आरसीटी व विविध प्रवर्गाचे एकूण सात शासकीय महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी शासकीय योजनांची संपूर्ण माहिती दिली असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या