🌟पुर्णेतील मस्तानपुरा नवी आबादी परिसरातील विद्युत पोलांवर तात्काळ लाईट बसवण्याची नागरिकांची मागणी....!


 🌟नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांना दिले निवेदन🌟


पुर्णा (दि.०४ जुलै २०२३) :- पुर्णा शहरातील मस्तानपुरा नवी आबादी परिसरात मागील बऱ्याच महिन्यांपासून लाखो रुपयांच्या शिसकीय विकासनिधीची नियोजनबध्दरित्या विल्हेवाट लावण्याच्या अशुध्द हेतूने विद्युत पोल बसवण्यात आले खरे परंतु या विद्युत पोलांवर लाईट अद्याप देखील बसवण्यात आलेले नाही त्यामुळे हे विद्युत पोल परिसरात केवळ शोभेच्या वास्तू झाल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषद प्रशासनाने भ्रष्टाचाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत लावलेल्या नवीन विद्युत पोलावर लाईटच बसवण्यात आले नसल्यामुळे या पोलांवर तात्काळ लाईट बसवण्यात यावे या अशी मागणी दि.०३ जुलै रोजी मुख्याधिकारी युवराज पौळ यांना निवेदनात केली आहे शहरातील  प्रभाग क्रमांक ०१ मधील मस्तानपुरा नवी आबादी मधील मागील बऱ्याच महिन्यांपासून विद्युत पोल वरील लाईट बंद असल्यामुळे व तसेच नवीन आबादी येथे नवीन अंदाजे ७० विद्युत पोल बसवण्यात आले आहे तरी त्या सर्व विद्युत पोलावर अद्यापही नवीन लाईट बसवण्यात आले नाही सध्या पावसाळा सुरू झाला असून  प्रभागांमधील ये जा करणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे व पावसाळ्यामुळे साप विंचू अशा जनावरापासून मोठा  धोका नाकारता येत नाही तरी मस्तानपुरा नवी आबादी येथील प्रभागांमध्ये  तात्काळ नवीन लाईट बसवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली त्यावेळी  शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख जुबेर शेख हबीब तौफिक लाला शेख अरबाज सिकंदर अन्सारी समीर शेख मोहसीन शेख रेहान शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या