🌟डॉ.झाकीर हुसेन मदरसा व शाळा आधुनिकीकरण योजनेसाठी १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन...!


🌟परभणी जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे🌟 

परभणी (दि.२४ जुलै २०२३) : राज्यातील नोंदणीकृत मदरशाच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना  व धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी  अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषदेच्या शाळा व दिव्यांगांच्या शाळांमध्ये २०२३-२४ या वर्षात पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येणार असून, या योजनेंतर्गंत पात्र शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मदरशांचे अनुदानाच्या शिफारशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही योजना सन २०२३-२४ वर्षासाठी राबविण्यात येणार असून, या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरशांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. हे प्रस्ताव प्राप्त होताच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीमार्फत त्यांची शासन निर्णयातील निकषानुसार तपासणी करून पात्र मदरशांची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे. हे सर्व प्रस्ताव १० ऑगस्ट पूर्वी पाठवणे अपेक्षित असून, त्यानंतर प्राप्त प्रस्ताव शिफारशीसाठी स्वीकारले जाणार नाहीत, असेही त्यांनी कळविले आहे.......    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या