🌟पुर्णा शहरातील विविध प्रभागांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या बोगस सिमेंट रोड/सिमेंट नाल्यांची बांधकाम...!


🌟बोगस कामांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत बोगस तांत्रिक अहवालाच्या आधारे काढली गेली भ्रष्ट गुत्तेदारांची बिल🌟

पुर्णा (दि.०३ जुलै २०२३) - पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार अवघ्या एक महिन्यापुर्वी स्विकारणारे मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी बोगस कामांसंदर्भात आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवत काढण्यास सुरुवात केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला असून शहरातील प्रभाग क्रमांक ०८ येथील काम वगळता शहरातील क्रमांक ०१ प्रभाग क्रमांक ०२,प्रभाग क्रमांक ०४,प्रभाग क्रमांक ०५,प्रभाग क्रमांक ०६,प्रभाग क्रमांक ०७,प्रभाग क्रमांक ०९ प्रभाग क्रमांक १० या प्रभागां संबंधित कामे दर्जाहीन असतांना देखील यातील काही कामांची ६०% तर काही कामांची १००% बिल साक्षात युवराजी आवेशात काढण्याचा महापराक्रम मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी केला कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुर्णा शहरात नगर परिषदे अंतर्गत होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची नांदेड येथील शासकीय तंत्र निकेतण स्थापत्य अभियांत्रिकीचे कर्तव्यदक्ष सिनियर प्राध्यापक श्री.लक्ष्मण जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करीत रिबाउंड हॅमर मशीनने चाचणी करीत शहरातील प्रभाग क्रमांक ०८ येथील काम वगळता शहरातील क्रमांक ०१ प्रभाग क्रमांक ०२,प्रभाग क्रमांक ०४,प्रभाग क्रमांक ०५,प्रभाग क्रमांक ०६,प्रभाग क्रमांक ०७,प्रभाग क्रमांक ०९ प्रभाग क्रमांक १० या प्रभागां संबंधित कामे दर्जाहीन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी या सर्व कामांचा अहवाल भेटाळला होता परंतु या बोगस कामांसंदर्भात अनेक तक्रारी जिल्हाधिकारी आंचल गोयल परभणी यांच्यासह जिल्हा नगर प्रशासन अधिकारी श्री.जगताप यांच्या देखील करण्यात आल्या होत्या या संदर्भात जिल्हा नगर प्रशासन अधिकारी जगताप यांनी मुख्याधिकारी पौळ यांच्यासह सबओव्हर सिअर संजय दिपके यांना खडसावून सांगितले होते की आपण या सर्व बोगस कामांची तक्रारदारांच्या समक्ष प्रत्यक्ष पाहनी करुन नंतरच या कामांची बिल काढण्याचे निर्देश दिले होते परंतु प्रत्यक्ष पाहणी नकरता मुख्याधिकारी पौळ सबओव्हरसिअर संजय दिपके,नगर अभियंता मंगेश देशमुख यांनी कोट्यावधी रुपयांच्या बोगस कामांचा तांत्रिक अहवाल संबंधित भ्रष्ट गुत्तेदारांसह पदद्या मागील जनमतधारी भ्रष्टाचाऱ्यांनी आर्थिक तडजोड करुन उस्मानाबाद शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून आणल्यानंतर या बोगसकामांची बोगस तांत्रिक अहवालाच्या आधारे बिल अदा केल्यामुळे मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या कार्यकुशलतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तक्रारदारांसह सर्वसामान्य जनतेला 'दाम करी काम वेड्या' या मराठी सिनेमातील....

 बारा डोळ्यांनी पाप सारी नारायन बघतो

 पैश्यापाई मानुस मरतो पैशावर जगतो

वासुदेवाची ऐका वाणी,जगात न्हाई राम रे

दाम करी काम येड्या,दाम करी काम रे

पैशाची जादू लई न्यारी,तान्या पोराला

 त्याची हाव आई सोडून घेतय झेप 

पैशाच्या मागुनी धाव,जन्मापासनं 

सारी मानसं या पैशाची गुलाम रे

एकंदर पुर्णा नगर परिषद प्रशासनाची अवस्था अश्याच प्रकारची झाली असून नगर परिषद भ्रष्टाचाऱ्यांसाठी अभयारण्य झाले की काय ? असा नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या