🌟शिक्षकी पेशाला समर्पितपणे वाहून घेतलेलं आदर्श व्यक्तिमत्व रामकिशन साळवे सर....!


🌟रामकिशन विठ्ठलराव साळवे 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमधून दिनांक 31 जुलै 2023 ला सेवानिवृत्त होत आहेत🌟

✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व : लेखक - श्रीकांत हिवाळे सर

पुर्णा (दि.३० जुलै २०२३) - पुर्णा येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय डॉ .आंबेडकर नगर पूर्णा येथील ज्येष्ठ विद्यार्थी प्रिय शिक्षक रामकिशन विठ्ठलराव साळवे 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमधून दिनांक 31 जुलै 2023 ला सेवानिवृत्त होत आहेत.

महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व कार्यावर त्यांची अगाध श्रद्धा.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.शिक्षणाच्या माध्यमातून मानवाची सर्वांगीण प्रगती होते.शिक्षणाला चारित्र्य व सदाचाराची जोड असली पाहिजे.हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विषयक विचाराचे बाळकडू त्यांचे आई  सोनाबाई व वडील विठ्ठलराव साळवे अगदी बाल वयामध्ये पाजले संस्कारातून घडतो माणूस या वचनानुसार अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण त्यांची जन्मभूमी सावंगी भुतनर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी घेतले.

पुढील उच्च शिक्षणासाठी आंबेडकरी व धम्म चळवळीचे प्रमुख केंद्र असलेलं पूर्णा या ठिकाणी ते आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व गुरुबुद्धी महाविद्यालय पूर्णा या ठिकाणी त्यानी शिक्षण घेतले.पूर्णा या ठिकाणी  संत गाडगे बाबा एज्युकेशन सोसायटी परभणी संस्थापक अध्यक्ष  त्यांचे काका अशोक राघोजी साळवे यांच्यासोबत ते आले.त्यावेळी अशोक साळवे हे शिक्षण घेत होते.पूर्णा या ठिकाणी सुप्रसिद्ध समाजसेवक भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे साहेब त्यांच्या पत्नी पूर्णा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व ज्येष्ठ समाजसेविका गयाबाई खंदारे स जा बाई खंदारे राजकुमार खंदारे रामा लोखंडे आदी उदार अंतकरणाच्या सदैव सहकार्याची मदतीच्या भावना असणाऱ्या नातेवाईकांनी शिक्षण घेत असताना मदत केली.


पुर्णा या ठिकाणी जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे यांच्याकडे अशोकराव साळवे सर घेऊन गेले.अशोकराव साळवे अगोदर च जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये इंदिरा गांधी कन्या विद्यालय मध्ये शिक्षक म्हणून लागले होते.त्यांनी विनंती केली आपण रामकिशन साळवे यांना आपल्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून घ्या.रामकिशन साळवे सरांची जिद्द चिकाटी मेहन त आणि त्यांच्या सू स्वभावाची कल्पना अशोकराव साळवे यांनी मोरे सरांना करून दिली.क्षणाचाही विलंब न लावता प्राचार्य मोहनराव मोरे सरांनी त्यांना आपल्या संस्थेत शिक्षक म्हणून रुजू करून घेतले.

त्या काळामध्ये ही शाळा विनाअनुदान तत्त्वावर होती.शाळेमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन शिक्षणामध्ये त्यांना गोडी कशी लागेल यासाठी विशेष प्रयत्न केले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये सभा धिट पणा भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.शाळेचा सांस्कृतिक विभाग त्यांच्याकडे होता.शिस्तप्रिय स्वभाव नाविन्यपूर्ण उपक्रम खिलाडू वृत्ती यामुळे त्यांच्या व सहकार्याच्या सांघिक प्रयत्नामुळे त्यांचे अगणित विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेऊन शासकीय निमशासकीय सेवेमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

अध्यापनाबरोबर त्यांना गीत गायनाची भजनाची मनस्वी आवड आहे अनेक भीम बुद्ध गीते त्यांच्या मुखोद्गगत आहेत.पुर्णा येथील सामाजिक धार्मिक आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते.ते एक आदर्श व संस्कारक्षम कुटुंब प्रमुख आहेत.त्यांना समर्थ साथ देण्याचे काम त्यांच्या अर्धांगिनी छायाबाई करत असतात.ह्या दाम्पत्यांना आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार शुभ दुःखामध्ये आणि अडचणीमध्ये अनेक नातेवाईकांना गावांमध्ये भावकीतील लोकांना गावकऱ्यांना  तन-मन-धनाने सहकार्य केले आहे.करत आहेत.सावंगी भुतनर या ठिकाणी बुद्ध विहारांमध्ये भव्य व दिव्य बुद्धमूर्ती बसविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

त्यांच्या जीवनवेलीवर  सुपुत्र रोहन सुकन्या शिल्पा व श्रद्धा संस्कारक्षम फुले उमललेली आहेत थोरली सुकन्या शिल्पाचे लग्न झाले असून तिचे मिस्टर विकास गायकवाड वन खात्यामध्ये वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत.रोहन आणि श्रद्धा उच्च शिक्षण घेत आहेत.सर्व प्रकारच्या विकारापासून व व्यसनापासून कोसो दूर असलेले कमालीची मैत्रेय भावना अंगी असलेले साळवे सर तीन दशकाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.सेवानिवृत्तीनंतरच त्यांच आयुष्य सुख समाधान व समृद्धीत जावो त्यांना व समस्त कुटुंबाला आयु व आरोग्य बल व वैभव प्राप्त होवो ही मनोकामना...!

शुभेच्छुक श्रीकांत हिवाळे सर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा जिल्हा परभणी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या