🌟नांदेड येथील मागील गुरुद्वारा बोर्ड कार्यकारीणीच्या गैरव्यवहारांची माहिती देण्यास अधिकाऱ्याची टाळाटाळ....!


🌟सामाजिक कार्यकर्ते सरदार जगदिपसिंग नंबरदार यांचा आरोप🌟

नांदेड (दि.०९ जुलै २०२३) - नांदेड येथील विद्यमान गुरुद्वारा बोर्ड कमिटीच्या पूर्वीच्या कार्यकारीणी कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला होता. या प्रकरणी विद्यमान अध्यक्ष डॉ. परविंदरसिंघ पसरिचा यांनी चौकशी करून राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. या अहवालाची माहिती देण्याबाबत जगदीपसिंग नंबरदार यांनी माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी हे माहिती देण्यास टाळाटाळ करुन या प्रकरणाची लपवाछपवी करीत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त होत आहे.


      गुरुद्वारा बोर्ड अध्यक्षपदी डॉ. परविंदरसिंग पसरिचा यांच्या नियुक्तीपूर्वी अस्तित्वात गुरुद्वारा बोर्ड कार्यकारीणी कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अध्यक्षांनी राज्य शासनास एक अहवाल सादर करून कारवाईची मागणी केली होती. या कारवाईच्या व अहवालाच्या संदर्भाने स. जगदीपसिंग नंबरदार यांनी गुरुद्वारा बोर्ड कार्यालयास माहिती अधिकार 2005 अंतर्गत माहिती देण्याची मागणी केली आहे. परंतु संबंधित जनमाहिती अधिकारी हरजितसिंघ कडेवाले व अपील अधिकारी ठाणसिंघ बुंगई यांचेकडून दिशाभूल करीत माहिती बाबत लपवाछपवी करीत संशयास्पद उत्तरे देऊन माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

      याप्रकरणी जगदीपसिंग नंबरदार यांनी वजीराबाद पोलीस ठाणे येथे तक्रार देऊन संबंधितावर गुन्हेगारी स्वरूपाचे कलम नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून योग्य ती  कारवाई न केल्यास नंबरदार यांनी न्यायालयामध्ये दाद मागण्याचा इशारा दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या