🌟टमाट्याला भाव मिळत नाही तर 'लाल चिखल' होतो तेव्हा अभिनेता सुनील शेट्टी झोपलेला असतो का ? डॉ.संतोष मुंडे


🌟डॉ.संतोष मुंडे सुनील शेट्टीला पाठवणार टमाट्याचे पार्सल🌟


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - टमाट्याचे वाढलेले भाव बघून काही शेतकरीद्रोहींच्या पोटात गोळा उठला आहे. टमाट्याचे किंमतीबाबत सुनील शेट्टीने केलेल्या वक्तव्याची निंदा करत सामाजिक कार्यकर्ते डॉ.संतोष मुंडे यांनी सुनील शेट्टीला टमाट्याचे पार्सल पाठवून त्याचा प्रतिकात्मक निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनील शेट्टी एका मुलाखतीत म्हणाला की "टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचा परिणाम माझ्या स्वयंपाकघरावरही होऊ लागला आहे. आम्ही ताजे उगवलेले अन्न खाण्यावर विश्वास ठेवतो. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. आजकाल मी टोमॅटो कमीच खातो. लोकांना वाटेल की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते.”


लेखक भास्कर चंदनशिवे त्यांच्या 'लाल चिखल' कथेत म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा रुपया, दोन रुपये किलो भाव टमाट्याला असतो तेव्हा कोणी शेतकऱ्यांच्या कष्टाची पर्वा करत नाही. कधी कधी पडेल भावात माल विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून देण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलतो. तेव्हा कोणी कोणी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाही. तेव्हा सुनील शेट्टी सारखे लोकं झोपलेले असतात का? असा संतप्त सवाल डॉ. संतोष मुंडे यांनी केला आहे.

एकेका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणाऱ्या सुनील शेट्टीकडे हमर एच3, मर्सिडीज-बेंज एसयूवी, टोयोटा प्राडो, लैंड क्रूजर, जीप रैंगलर अशा महागड्या गाड्यांसाठी पैसे असतात. त्याच्या एच टू ओ वॉटर पार्कमध्ये प्रवेश शुल्क एका व्यक्तीसाठी हजारो रुपये घेतले जाते. त्याचे काही हॉटेल्सही आहेत फक्त त्यातून सुमारे शंभर करोड रुपये वर्षाला कमावतो आणि कधी नाही ते शेतकरी चार पैसे कमवत असला तर त्याच्या सारख्या शेतकरीद्रोही लोकांच्या पोटात दुखते. त्यामुळे त्याला डॉ. संतोष मुंडे हे टमाट्याचे पार्सल पाठवणार आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या