🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात जनुकशास्त्रावर व्याख्यान...!


🌟महाराष्ट्र उदगीर उदयगिरी महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ.बी.एम.संदीकर यांचे यावेळी व्याख्यान झाले🌟


पुर्णा (दि.२८ जुलै २०२३) - पुर्णा येथील श्री.गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागकडून आज शुक्रवार दि.२८ जुलै २०२३ रोजी डॉक्टर बी.एम.संदीकर,सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख,महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,उदगीर यांचे "जेनेटिक इंजीनियरिंग" या विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले. प्रस्तावना विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर कमठाणे डी.सी. यांनी केले. बिएससी. प्रथम,द्वितीय आणि तृतीय वर्गाचे विद्यार्थी या व्याख्यानाला उपस्थित होते. 

आपल्या मार्गदर्शनात प्रा.संदिकर यांनी जेणेटिक इंजिनिअरिंग ही जैवविज्ञानाच्या क्षेत्रातील एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये जीवाच्या जीन्सचे व्यवस्थापन केले जाते व त्याच्या लक्षणांची किंवा गुणांची संशोधन केली जाते असे सांगितले.त्याच बरोबर त्यांनी रिकॉम्बिनंट डीएनए,जीन क्लोनिंग,जेणेटिक संशोधन, ट्रांसजेनिक प्राणी,जीन संपादन  जेनेटिक सुधारणा आणि लॅक्टिक एसिड बॅक्टरिया, बी टी कापूस, biotechnology चे मानवासाठी महत्त्व , वाढलेल्या लोकसंख्येसाठी अन्न पुरवणे, बायोफरटीलायझर याबाबीचे महत्त्व विषद केले.इन्सुलिन हे बॅक्टरीया वापरून बनवणे या बद्दलचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थांना केले प्राध्यापक डॉक्टर रवींद्र राख यांनी आभार व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या