🌟मनिपुर येथील क्रुर व मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनेचा मंगरुळपीर येथे केला निषेध...!


🌟अखिल भारतीय आदिवासी एम्प्लाॅइज फेडरेशनचे प्रशासनाला लेखी निवेदन🌟

फुलचंद भगत

वाशिम/मंगरुळपीर (दि.२६ जुलै २०२३) :- मणिपूर येथे आदिवासी महिलांची विवस्त्र करुन धिंड काढणारे नराधमांना तात्काळ अटक करुन कार्यवाही करण्यात यावी. तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी जाणीवपुर्वक मनिपूर हिंसेला खतपाणी घातल्याचा आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाॅइज फेडरेशन,मंगरुळपीर संघटनेने येथील तहसिलदार यांना मागण्याचे लेखी निवेदन देवुन निषेध व्यक्त केला.

                मणिपूर मानसिक हिंसेने होरपळत आहेत. तेथील राज्यसरकार व केंद्र सरकार यांनी जाणीवपुर्वक या हिंसेला खतपाणी घातले आहे. यांचा संघटनेतर्फे लेखी निवेदन देवून जाहीर निषेध नोंदवला.या हिंसाचारात विरोधी गटाला धडा शिकविण्यासाठी आदिवासी समुहातील स्त्रीयावर लैगींक अत्याचार करण्याचे घृणास्पद प्रकार घडत आहे. अलीकडे एका व्हिडीओ क्लीपद्वारे उघडीस आलेले आदीवासी स्त्रीयांची नग्न धिंड आणि त्यांची शारीरीक विटंबनाची क्रुर व अमानुष्य घटना मानवाला कलंकीत करणारी आहे. या घटनेचा तसेच स्त्रीयांवरील अशा सर्व प्रकारच्या अत्याचाराचा आम्ही तिव्र धिक्कार करतो असे आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाॅइज फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन मणिपूर मधील हिंसाचार ताबडतोब काबुत आणला पाहिजे या हिंसाचाराचे भक्ष्य झालेल्या पिडीतांना आवश्यक ते सहाय्य आणि त्यांचे योग्य ते पुर्नवसन करण्यात यावे अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आले.या निवेदनावर संघटनेचे राष्टीय अध्यक्ष मधुकर ऊईके, राज्यकार्यकारीनी सदस्य सुभाष पवने साहेब,जिल्हा अध्यक्ष नाजुक भोंडणे,जिवन हगवणे,बाबाराव गोदमले,सुखदेव ढंगारे,मंगला ढगे,गोपाल मैगणे,सुनिल सातपुते,योगेश्वर ठोंबरे,सदानंद गेडाम,प्रकाश टाले,सिमा धुर्वे,शांताबाई गेडाम,भारती गेडाम,सौ.पुष्पाताई पवने,ज्योती बळी,गंगा घोरसडे,वंदना गायकवाड,महानंदा अगुलदरे,सारिका पांडे,सपना चौधरी,मंगला भोंडणे,गोदावरी ढगे,रेणुका नाईक,मंगला भोंडणे,मनिषा हगवणे,मंदाकिनी भोंडणे,रेखा झळके,शारदा गिराटकर,लक्ष्मीताई सातपुते आदी समाजबांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या