🌟नांदेड जिल्हा पोलिस दलातील सायबर शाखा व स्थागुशाची धाडसी कारवाई....!


🌟धाडसी कारवाईत मोबाईल मिसींग मथील १६,३३,०००/- रुपयांचे ११० अंड्रॉईड मोबाईल हस्तगत🌟

नांदेड (दि.२८ जुलै २०२३) - नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध धेण्याकरीता मा. पोतीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोलीस निरीक्षक औमकांत आनंदराव चिंचोळकर यांना आदेशीत केले होते पोलिस स्टेशन सायबर यांनी त्यानुसार सायबर सेल,स्थानिक गुन्हें शाखा व नांदेड जिल्हयातील सर्व उपविभागाचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.

नांदेड येथील उपविभागातील पथकाने व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण ११० मोबाईल किंमत १६,३३,०००/- रूपयाचे हस्तगत केले आहेत, त्यांचे आज एकत्रितरीत्या मा.पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते वाट्प करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांकारची माहिती नांदेड पोलीस दलाचे "नांदेड पोलिस" या फेसबूक पेज व ट्युटर वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक  ओळखुन सायबर पोलिस स्टेशेन नांदेड येथुन मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सदाची कार्यवाही ही मा. पौलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार, नांदेड डॉ.श्री खंडेराय धरणे, भोकर, गुह पोलीस उपअधिक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप पो. নি.डी.जी.चिखलीकर, पो.नि. ओमकांत आनंदराव चिंघोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.स्टे सायबर पोउपनि जी. जी. दळ्वी, एस.एन. थोरवे, पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओदणे, रेश्मा पठाण, अनिता नलगोडे, दाविद पिडगे, दिपक शेवाळे, मोहन स्वामी, किशोर जैस्वाल, व्यंकटेश सांगळे, सौरभ सिद्धेवार यांनी पार पाडली.

सदर कामगीरी बाबात मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या