🌟परभणी पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी : कोतवाली हद्दीतील हायवा चोरीचा छडा लावला अवघ्या बारा तासात....!


🌟हायवा चोरी प्रकरणातील तिन चोरटे ताब्यात चोरीतील हायवा जप्त : वाशीम येथील दोन गुन्ह्यांची दिली कबूली🌟

परभणी (दि.२३ जुलै २०२३) - परभणी शहरातील कोतवाली पोलिस स्थानकाच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी हायवा पळवल्या संदर्भात कोतवाली पोलिस स्थानकात काल शनिवार दि.२२ जुलै २०२३ रोजी अहेमदनगर परभणी येथील शेख उबेद शेख हमीद यांनी फिर्याद दिली होती त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले होते की दि.२१ जुलै २०२३ रोजी दुपारी १२-३० वाजेच्या सुमारास गंगाखेड रोड रूची हॉटेलच्या पाठीमागे काकडेनगर परभणी येथे त्यांनी लावलेला त्यांचा हायवा क्रमांक एमएच-२६-बीई-२६२२ पांढऱ्या निळया रंगाचा जुना वापरातील हायवा किंमत अंदाजे १० लाख (१०,०००००/-) रूपये हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. त्यावरून पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुरनं. २०७/२०२३ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटने संदर्भात गुन्हा दाखल होताच तात्काळ आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आदेश परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पोलिस अधिक्षक श्रीमती रागसूधा आर.यांनी कोतवाली पोलिस स्थानकाच्या पोलिस निरिक्षकांसह स्थानिक गुन्हें शाखेच्या पोलिस निरिक्षकांना देखील दिले होते त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पो.नि.व्हि.डी.चव्हाण व पो.नि.शरद जन्हाड,पोउपनि.नागनाथ तुकडे,पोउपनि.साईनाथ पुयड,पोउपनी.मारोती चव्हाण,पोउपनि.अजीत बिरादार,पोउपनि.गोपीनाथ वाघमारे,पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे,रवी जाधव,विलास सातपुते,दिलावर खान,हरीचंद्र खुपसे, नामदवे डुबे,विष्णु मुरकुटे,संजय घुगे,राम पौळ,मधुकर ढवळे,हुसेन खान सर्व स्थागुशा.परभणी तसेच सायबर पोलिस स्टेशचे बालाजी रेडडी,गणेश कौटकर यांना हायवा चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना पथकास खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यावसरून आरोपी नामे सय्यद मतीन सय्यद रशीद, वय-३० वर्ष व्यवसाय-मजुरी राहणार आनंदनगर परभणी,शंकर बाबाराव बुधवंत वय-२७ वर्ष व्यवसाय-मजूरी राहणार आनंदनगर परभणी,विशाल ऊर्फ अब्दुल रहेमान ना्गातिलक वय-३३ वर्ष राहणार प्रकाश आंबेडकरनगर धाररोड परभणी या तिन संशयीत ईसमांना पाठलाग करून त्यांना चोरीस गेलेल्या हायवासह अवध्या १२ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी मिळून हा गुन्हा केला असल्याचे सांगीतले आहे. तसेच त्यांनी वाशीम येथून एक ॲटो व एक बजाज डिस्कव्हर कंपनीची मोटारसायकत्ल चोरल्याची कबूली दिली असून सदर गुन्हायाचा अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या