🌟महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्रातील अनेक जिल्हे बनावट विदेशी दारुच्या विळख्यात : मद्यपींची वयोमर्यादा धोक्यात ?


🌟अनेक अधिकृत मध्य विक्रेत्यांसह अवैध दारू विक्रेत्यांकडून देखील बनावट विदेशी दारुची सर्रास विक्री🌟

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा क्षेत्रातील अनेक जिल्हे बनावट विदेशी विळख्यात सापडल्याचे भयावह चित्र सर्वत्र पहावयास मिळत अश्या बनावट दारुच्या निर्मितीसह होलसेल व किरकोळ विक्री मोठ्या प्रमाणात राजरोसपणे होत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र आपल्या कर्तव्याशी दगलबाजी करून जनसामान्य मद्यपींच्या आरोग्याशी जिवघेणा खेळ करीत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.


मराठवाडा क्षेत्रातील बिड,परभणी,नांदेड,लातूर,हिंगोली,जालना,उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये राज्यमार्गांसह महामार्गांवरील खानावळींच्या नावांवर चालणाऱ्या धाब्यांवर सर्रास बनावट विदेशी दारुची बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसत असून संबंधित धाबे चालकांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर ठराविक  लक्ष्मीमंत्र दिला जात असल्यामुळे या बनावट विदेशी दारू निर्मितीसह तस्करी व विक्रीला देखील हिरवा कंदील राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून दाखवला जात असल्याचे दस्तुरखुद्द धाबे चालकांकडूनच बोलले जात आहे.

राज्यातील नामांकीत विदेशी दारू विक्रीवर अल्पशः मुनाफा अर्थात नफा मिळत असल्यामुळे धाबे चालकांसह अधिकृत मद्य विक्रेते तसेच बार चालक देखील नामांकीत कंपनीची बनावट दारू विक्री करीत चारपट मुनाफा मिळवण्याच्या लालसेपोटी मद्य शौकीनांच्या जिविताशी जिवघेणा खेळ करीत असल्याचे निदर्शनास येत असून असाच बनावट विदेशी मद्याचा साठा बिड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातल्या बनसारोळा येथे आज मंगळवार दि.११ जुलै २०२३ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे या कारवाईत दुचाकी स्वाराकडून तब्बल २२ बॉक्ससह दुचाकी अंदाजे किंमत १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

बिड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातल्या बनसारोळा गावात झालेल्या या कारवाई वरून असे निदर्शनास येते संपूर्ण मराठवाड्यात बनावट विदेशी दारू निर्मितीसह होलसेल/किरकोळ विक्रीची एक साखळीच तयार झाली असून अश्या प्रकारे बनावट विदेशी दारूचे निर्मिती विक्रीचे जाळे मराठवाड्यातील बिड,परभणी,हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या