🌟परभणी जिल्ह्यातील पक्षीय तसेच अन्य राजकीय घडामोडींवर स्वतः लक्ष ठेवणार - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे


🌟चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांबरोबर साधले हितगुज🌟

परभणी (दि.29 जुलै 2023) : परभणी जिल्ह्यातील पक्षीय तसेच अन्य राजकीय घडामोडींवर आपण स्वतः लक्ष ठेवणार आहोत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

            प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मातंग समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास हजेरी लावल्या पाठोपाठ ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी वरपुडकर व प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, भिमराव वायवळ यांच्यासह शेकडो समर्थक व अन्य नागरीकांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. विशेषतः ब्रह्मवृंदांनी वेदमंत्रोच्चारात त्यांचे स्वागत केले. त्या पाठोपाठ ताडकळस बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांनी बावनकुळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस संजय केणीकर, किरण पाटील, विक्रांत पाटील, आमदार सौ. मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, सभापती बालाजी रुद्रवार, आनंद भरोसे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे, सुरेश गिरी, अभिषेक वाकोडकर, योगेश जोशी, विठुगुरु वझुरकर, मनोज धर्माधिकारी, सुनील देशममुख, संजय शेळके, मोहन कुलकर्णी, मधुकर गव्हाणे, अनुप शिरडकर, संजय रिझवानी, विठ्ठलराव रबदडे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, दिनेश नरवाडकर यांच्यासह अन्य शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, पक्षाचे मजबुतीकरण हे नितांतर गरजेचे आहे. त्यामुळेच आपण स्वतः लक्ष केंद्रीत करणार आहोत. पक्षीय व अन्य राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणार आहोत, असे म्हटले. वाकोडकर यांना निश्‍चितच प्रदेश पातळीवर न्याय दिला जाईल, अशी ग्वाही देवून बावनकुळे यांनी वरपुडकर असो, वाकोडकर हे दोघे या जिल्ह्याच्या पक्षीय निर्णय प्रक्रियेतील महत्वपूर्ण घटक आहेत, याची जाणिव पदाधिकार्‍यांसह अन्य राखतील, असा विश्‍वासही व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या