🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस ग्रामपंचायत प्रशासनाचा खुन्नशी कारभार ?
🌟जल जिवन मिशनच्या नावावर उत्खनन केलेल्या रस्त्यांवर लावले मुरुमाचे ठिगळ अन् त्यातही दुजाभाव ?🌟


पुर्णा (दि.२८ जुलै २०२३) -
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील ग्रामपंचायत प्रशासनाने काही दिवसापूर्वी 'हर घर नल,हर घर जल' या जल जीवन मिशन योजने अंतर्गत निधीप्राप्त होण्यापुर्वीच उतावळा 'नवरा गुडघ्याला बाशिंघ' या उक्तीचा प्रत्यय देत मागील एप्रिल २०२३ या महिन्यात जिल्हा परिषद निवडणूकीची टिमकी वाजताच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण गावातील रस्त्यांवर जल जिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत असल्याचा भ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने ताडकळस गावातील सर्व रस्त्याचे अक्षरशः जेसीबी यंत्राने उत्खनन करीत पाईपलाईनच्या छड्या टाकल्या होत्या परंतु नंतर प्राप्त निवडणूक कार्यक्रम रद्द झाल्याने या रस्त्यांवरील खड्यांमध्ये खोदकामातून निघालेले मटरेल जसेच्या टाकण्यात आले त्यामुळे पावसाला सुरुवात झाल्यामुळे आजच्या घडीला गावातील या रस्त्यांची अवस्था चिखलमय पांदन रस्त्यांमध्ये झाल्यामुळे गावातील सर्व नागरिकांचे रहदारीचे मार्ग विस्कळीत झाले होते गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रसार माध्यमातून बातम्या प्रसारित झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली आणि नागरिकांना रहदारी करण्यासाठी रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आले परंतु वार्ड क्रमांक तीन मध्ये काही वेगळेच चित्र बघायला मिळाले काही ठिकाणी जिथे जास्त त्रास आहे तिथेच ग्रामपंचायत ने जाणीवपूर्वक मुरूम न टाकल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विचारपूस केली असता नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे प्रसार माध्यमांना रोडवर मुरूम टाकण्याची मागणी का केली म्हणून तिथेच जाणीवपूर्वक मुरूम न टाकून एकाला लवतीचे एकाला सवतीचे असा ग्रामपंचायत चा दुजाभाव स्पष्ट दिसून येत आहे त्यातच शासकीय अधिकारी ग्रामसेवक पाचपुंजे यांना सद्यस्थिती काय आहे बघण्या साठी विचारपूस केली असता साहेबांचे म्हणणे आहे तुम्ही सरपंचांनाच बोला कारण साहेबांना मात्र वेळच मिळत नाही आणि कसे मिळणार सरपंचाची हाजी हाजी करण्यासाठी त्यातच वेळ जातो ग्रामसेवक शासनाचा पगार घेत आहेत की सरपंचाचा अशा उलट सुलट चर्चेस उधान उठले आहे ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वचक राहिले नाही त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे नागरिकांकडून म्हटले जात आहे पाहूया यावर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या