🌟गंगाखेड तालुक्यातील मौ.तांदूळवाडील मयत जवान लक्ष्मण तांदळे यांच्या कुटुंबास आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिली भेट...!


🌟पावसाळी अधिवेशनात असल्याने आ.डॉ.रत्नाकर गुट्टे अंत्यविधीस उपस्थित राहू शकले नव्हते🌟

गंगाखेड तालुक्यातील मौजे.तांदूळवाडी येथील जवान लक्ष्मण रामराव तांदळे (वय ३४) यांचा राजस्थान येथे काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यु झाला होता दि.२६ जुलै रोजी मौ.तांदूळवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते परंतु आ.डॉ.रत्नाकर गुट्टे पावसाळी अधिवेशनात असल्याने अंत्यविधीस उपस्थित राहू शकले नव्हते त्यामुळे आज त्यांनी तांदळे कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. 

राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाचे वेड असल्याने ते सैन्यात गेले होते. सारं काही सुरळीत सुरू असताना काळाने हा घाला घातला आहे. त्यामुळे कुटुंब हादरले आहे, असे सांगताना कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले होते हा दु:खद प्रसंग कोणावरही येवू नये. मात्र, नियतीपुढे आपण काय करणार. त्यामुळे यातून बाहेर पडायला हवे.‌ शेवटी, आयुष्य म्हणजे सुख-दु:खाचा खेळ आहे, असे संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सांत्वन करताना म्हटले. 

यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, प्रभारी हनुमंत मुंढे, तांदळे परिवार, ग्रामस्थ उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या