🌟परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेतील अखेर अडथळा दूर....!


🌟आमदार मेघनाताई बोर्डाकरांच्या मागणीला यश : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे शिफारस : परवानगीचे प्रमाणपत्र🌟

परभणी (दि.०३ २०२३) :  परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीसह यावर्षी पासूनच्या प्रवेश प्रक्रियेस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नॅशनल मेडीकल कमीशनकडे शिफारस पत्र पाठवून परवानगीचे प्रमाणपत्र बहाल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे या वर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेतील मोठा अडथळा या शिफारस पत्रामुळे दूर झाल्याने अखेर आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

          केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी नॅशनल मेडीकल कमीशनकडे परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीसह यावर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेस शिफारस पत्राद्वारे परवानगीचे प्रमाणपत्र बहाल केले असून नॅशनल मेडीकल कमीशनने राज्य सरकारकडून या महाविद्यालयाच्या स्टेटससह अन्य गोष्टींबाबत प्रतिज्ञापत्र घ्यावे, असे स्पष्टपणे सूचविले असून त्यामुळे नॅशनल मेडीकल कमीशनद्वारे मंगळवारी काही तासातच या वर्षापासूनच्या प्रवेश प्रक्रियेस औपचारिकरीत्या परवानगीचे प्रमाणपत्र बहाल केले जाईल, हे निश्‍चित झाले आहेत.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या