🌟परभणीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी केले जेरबंद...!


🌟या दोघा चोरट्यांनी अनेक मोबाईल चोरले असावेत असा अंदाज🌟

परभणी (दि.१७ जुलै २०२३) : सर्वसामान्य नागरीकांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल पळविणार्‍या दोघा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले.

          नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक महिला मोबाईलवर बोलत असतांना दोन अज्ञात चोरट्यांनी या महिलेस चाकूचा धाक दाखवला अन् मोबाईल पळवला. नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख नदीम उर्फ छोटू शेख सलीम, संतोष उर्फ खुब्या तुकाराम पाईकराव या दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा आणखीन एक साथीदार असल्याची माहिती समोर आली. त्याआधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तीसर्‍याही आरोपीस पकडण्याची कारवाई सुरु केली. दरम्यान, या दोघा चोरट्यांनी अनेक मोबाईल चोरले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या