🌟चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय तात्काळ सुरू करा....!


🌟 राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय महिला अध्यक्षा मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.ज्योतीताई खेडेकर यांची मागणी🌟 

🌟शल्य चिकित्सक अधिकारी यांच्याकडे केली निवेदनाव्दारे मागणी🌟  

✍️ मोहन चौकेकर 

चिखली (दि.२५ जुलै २०२३) :-  चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय महीला  आघाडी अध्यक्षा तथा  मा. जि.प.सदस्या सौ. ज्योतीताई खेडेकर यांनी बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

     दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बऱ्याच दिवसापासून पूर्ण झालेली आहे, परंतु अजून ते रुग्णालय जनतेसाठी सुरू करण्यात आलेले नाही.   तरी तेथे तात्काळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून जिल्हा उप रुग्णालय जनतेसाठी सुरू करण्यात यावे. चिखली येथील जिल्हा उप रुग्णालय सुरू नसल्याने जनतेला बुलढाण्याला जावे लागत आहे, जर  चिखली येथील जिल्हा उप रुग्णालय सुरू झाले तर चिखलीतील जनतेला बाहेर कुठेही हलवण्याची गरज पडणार नाही त्यामूळे  तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात जनतेसाठी सुरू करावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय महीला  आघाडी अध्यक्षा तथा  मा. जि.प.सदस्या सौ. ज्योतीताई खेडेकर यांनी बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.यावेळी निवेदन देताना  शरद  ढोरे , राजू  म्हस्के हे उपस्थित होते......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या