🌟पुर्णा नगर परिषदे समोरील दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने पळवली अंदाजे १५ हजार रुपयांची रक्कम...!


🌟माहिन कोल्ड्रिंक्स या दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करीत रक्कम पळवणारा चोरटा सिसीटीव्ही फुटेज मध्ये कैद🌟

पुर्णा (दि.३० जुलै २०२३) - पुर्णा नगर परिषद समोरील संजय गांधी नगर परिसरातील 'माहिन कोल्ड्रिंक्स हाऊस' या दुकानाच्या शटरचे कीलूप तोडून दुकानात प्रवेश करीत दुकाना बराच वेळ मुक्तसंचार करीत दुकानातील गल्ल्यात ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्ब्यातील अंदाजे १० ते १५ हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात भामट्याने आज रविवार दि.३० जुलै २०२३ रोजी मध्यरात्री १२-३० वाजेच्या सुमारास घडली सदरील अज्ञात भामटा दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करीत दुकानात अगदी निर्धास्तपणे झाडाझडती घेत चोरी करीत असल्याचे संपूर्ण चित्रण दुकानातील सिसीटीव्ही पुटेजमध्ये झाले आहे.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा शहरातील मस्तानपुरा येथील रहिवासी जाकीर खान इकबाल खान पठाण यांनी आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी नगर परिषद पुर्णा समोरील संजय गांधी नगर परिषद परिसरात 'माहिन कोल्ड्रिंक्स हाऊस' नावाने टाकले असून त्यांनी आपल्या दुकानात तालुक्यातील धनगर टाकळी येथील रहिवासी गोविंद आढाव यांना मुनीम म्हणून ठेवलेले असून गोविंद आढाव नेहमी प्रमाणे दिवसभरातील व्यवसायातून आलेली रक्कम गल्ल्यातील प्लास्टिक डब्ब्यात ठेवून काल शनिवार दि.२९ जुलै २०२३ रोजी रात्री ०९-०० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेला यानंतर आज रविवार दि.३० जुलै २०२३ रोजी मध्यरात्री १२-३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करीत बराचवेळ दुकानाची झाडाझडती घेऊन गल्ल्यातील नगदी अंदाजे १५ हजार रुपयांची रक्कम व जातांना सोबत कोल्ड्रींकची बोटलही घेऊन जात असल्याचा संपूर्ण प्रकार दुकानातील सिसीटीव्ही पुटेज मध्ये कैद झाला आज सकाळच्या सुमारास दुकान उघडतेवेळी दुकानाचे कुलूप तुटल्याचे मुनीम गोविंद आढाव याच्या लक्षात आल्यामुळे त्याने दुकान मालक जाकीर पठाण यांना सांगितल्याने त्यांनी तात्काळ पुर्णा पोलिस स्थानकात जावून अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पुर्णा पोलीसानी कलम ३८०,४५७ अनुसार गुन्हा केला आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या