🌟आर्थिक साक्षरतेवर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय प्रश्नमंजुषा संपन्न....!


🌟अखिल भारतीय प्रश्नमंजुषाचे आयोजन परभणीत दिनांक 5 जुलै 2023 रोजी करण्यात आले होते🌟

परभणी (दि.08 जुलै 2023) : आर्थिक साक्षरतेच्या प्रयत्नांना आणखी चालना देण्यासाठी आणि भारत जी-20 अध्यक्षपद भूषवत आहे या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेवर अखिल भारतीय प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. 

प्रश्नमंजुषा सरकारी/महानगरपालिका शाळांवर लक्ष केंद्रित करुन ब्लॉक स्तरावर सुरु झाली आणि जिल्हा, राज्य आणि विभागीय स्तरावरील विविध स्तरानंतर राष्ट्रीय स्तरावर समाप्त होईल. भारतीय रिझर्व बँक यांच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, मुंबई आणि लीड बँक ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया परभणी यांच्या तर्फे आर्थिक साक्षरतेवर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय प्रश्नमंजुषाचे आयोजन परभणीत दिनांक 5 जुलै 2023 रोजी करण्यात आले होते.

जिल्हास्तरीय स्पर्धेचे विजेते प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद शाळा देऊळगाव गात, द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद शाळा जांब,  तिसरे पारितोषिक जिल्हा परिषद शाळा पेडगाव यांना मिळाले.पारितोषिक वितरण निवासी जिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरणासाठी यावेळी शिक्षणाधिकारी (मा) आशा गरुड, एनआयसी संचालक सुनील पोटेकर, आरबीआय मुंबई एलडीओ विश्वजित करंजकर, एलडीएम उदय कुलकर्णी, माजी एलडीएम सुनील हट्टेकर आणि आरसेटी संचालक जितेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते.

प्रश्नमंजुषामधील प्रथम विजेत्याची राज्यस्तरीय प्रश्नमंजुषाकरिता जिल्हा परिषद शाळा देऊळगाव गात यांची निवड केली आहे. राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 14 जुलै 2023 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या