🌟पुर्णा तालुक्यातील भाटेगाव,कंठेश्वर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ....!


🌟शेतकऱ्याच्या शेतातील शेती उपयुक्त साहित्यांच्या चोरीच्या घटना वाढल्या🌟

पुर्णा (दि.२२ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील भाटेगाव,कंठेश्वर परीसरात मागील दोन/तिन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतकरी आपआपल्या शेत आघाड्यावरील जनावरांना चारा पाणी करून शेतात न थांबता आपआपल्या घरी थांबत असल्याचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळ्या या परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील शेती उपयुक्त सामान चोरून नेत असल्याच्या घटना घडत असल्यामुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

भाटेगाव/कंठेश्वर परिसरात भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने येणारेच परीसरात चोऱ्या करीत असावेत असाही अंदाज व्यक्त होत आहे या वाढल्या चोरीच्या घटनांकडे पोलिस प्रशासनाने तात्काळ लक्ष केंद्रित करून चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या