🌟परभणी शहरातील दशनाम गोसावी समाज स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा.....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकर्यांकडे मागणी🌟


परभणी (दि.१९ जुलै २०२३) - परभणी शहरातील दशनाम गोसावी समाजाला अत्यंविधीसाठी धार रोड, परभणी येथे जागा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मागील २० ते २२ वर्षापासून समाजातील मृत व्यक्तींचे अंत्यविधी केले जातात, समाजामध्ये मृत व्यक्तीला मृतदेहाचा दफनविधी केला जातो परंतु मागील काही वर्षापासून या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने तसेच नाल्याचे पाणी स्मशानभूमीमध्ये जमा होते असल्याने दफनविधी करण्यात आलेल्या मृताची विटंबना होत आहे. शिवाय स्मशानभूमीकडे जाण्याकरीता इतर पर्यायी रस्ता उपयोगात आणन्याचा प्रयत्न केल्यास स्थानीक नागरीकांकडून अंतयात्रा नेण्यास अडवणूक व विरोध केला जातो, अशा वेळी जातीवाद व जातीय तेढ निर्माण होण्याचा धोका कायम असतो. या सर्व कारणांमुळे अंत्यविधी करण्यात आलेल्या मृतदेहाची विटंबना तर होतेच. शिवाय नव्याने अंत्यविधी करणे अवघड होते.


या स्मशानभूमीकडे जाण्यासाठीच्या रस्त्यावरील नाल्यावर पाईप टाकून देण्या बाबत व तात्पुरता कच्चा रस्ता तयार करुन देणे बाबत परभणी शहर महानगरपालिका प्रशासनास वेळोवेळी पत्रव्यवहार व निवेदने देऊन ही परभणी शहर महानगरपालिका प्रशासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही ही एक गंभीर बाब आहे. करीता जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालुन मोठया प्रमाणावर शहरामध्ये असलेल्या दशनाम गोसावी समाजाच्या अंत्यविधीचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत परभणी शहर महानगर पालिका प्रशासनास सुचित करावे या मागणी साठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मॅडम यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी श्री. प्रताप काळे यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई, शहर चिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, रामेश्वर पुरी, ज्ञानेश्वर गिरी,अनंता गिरी, दिलीप गिरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या