🌟नांदेड शहरातील सिंधी समाजाचे तरुण कार्यकर्ते तुलसी जगवाणी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे🌟

नांदेड (दि.२४ जुलै २०२३) - नांदेड शहरातील वजिराबाद येथील रहिवाशी तथा सिंधी समाजातील तरुण कार्यकर्ते तुलसी परसराम जगवाणी यांचे काल रविवार दि.२३ जुलै २०२३ रोजी रात्री ०८-०० वाजेच्या सुमारास वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 

त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार दि.२४ जुलै २०२३ रोजी दुपारी ०३-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मालपाणी बिल्डींग येथून निघून जुना मोंढा येथील रामघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 स्व.तुलसी जगवाणी यांच्या निधनानंतर नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे. मुकेश व नंदू जगवाणी यांचे ते लहान बंधू होत.नंदलाल झुरामल प्रतिष्ठाणचे ते संचालक होते......

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अन् जगवाणी कुटुंबास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवों....हिच इश्वरा चरणी प्रार्थना.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या