🌟राज्यातील सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍यांची परभणीत राज्यस्तरीय परिषद....!


🌟शिखर परिषदेचे दि.16 जुलै रोजी स्टेशन रस्त्यावरील श्री मंगल कार्यालयात आयोजन🌟

परभणी (दि.13 जुलै 2023) : राज्यातील सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍यांची 16 जूलै रोजी परभणीत राज्यस्तरीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.

              सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, बहुउद्देशीय विकास संस्था यांच्यावतीने या राज्यस्तरीय पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या शिखर परिषदेचे 16 जूलै रोजी स्टेशन रस्त्यावरील श्री मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. या पध्दतीची ही पहिलीच परिषद होणार असून सकाळी 10 वाजता त्याचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेतून सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांच्या अडीअडचणी या विषयी व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. या परिषदेस दायमा (औरंगाबाद), संपतराव जाधव (औरंगाबाद), महादेव पवार (पुणे), श्रीमती पेठे (सोलापूर), मोहन तोडकर (मुंबई), मधुकरराव केंद्रे (नांदेड) व नंदकुमार कांबळे (पुणे) हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेस जास्तीत जास्त सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कोटे तसेच महाराष्ट्र संघटक तथा सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक त्रिंबक कौटकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या