🌟यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री ब्रिजगोपाल तोष्णीवाल हे होते🌟
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर नगरीमध्ये नुतन तहसीलदार श्री सरवदे आणि नूतन पोलीस निरीक्षक श्री.अनिरुद्ध काकडे यांनी पदभार स्विकारला आहे यांचा स्वागत सोहळा जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मिडिया तर्फे शासकीय विश्रामगृह जिंतूर येथे करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री ब्रिजगोपाल तोष्णीवाल हे होते तर प्रमुख उपस्थिती भागवताचार्य गोसेवक श्री संदीप भाई शर्मा महाराज व श्री अनिस मौलाना, श्री ब्रिजगोपल तोष्णीवाल, श्री संजय कोकडवार, श्री राजू देवकर, श्री पांडुरंग पल्लेवार, पत्रकार अकबर सिद्दीकी, बालाजी शिंदे, रफिक भाई तांबोळी, इले्ट्रोनिक मीडिया चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार व शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आदी मान्यवर उपस्थिती होते.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुका अध्यक्ष अजमत पठाण, कार्याध्यक्ष बि .डी. रामपूरकर, सचिव सय्यद फिरोज भाई, संघटक खय्युम उर्फबाबा खान पठाण, रामकिशन ठोंबरे, गणेश पालवे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी पोलीस निरीक्षक काकडे यांनी शहरातील नागरिकांना एकता व भाईचारा ने राहण्याचे आवाहन केले.......
0 टिप्पण्या