🌟परभणी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनो सावधान : शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास होणार कारवाई...!


🌟राज्याच्या कृषि आयुक्तांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांना कारवाईचा दिला इशारा : पिक विमा नोंदणीसाठी केवळ एक रुपयाच🌟


परभणी (दि.०८ जुलै २०२३) : आपले सरकार सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना पिक विमा नोंदणीसाठी मनमानी दर आकारणी करीत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे गंभीर प्रकार होत असल्यामुळे अश्या केंद्र चालकांना राज्याचे कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांकडून पिक विमा नोंदणीसाठी ०१ रुपयांच्या वर रक्कम घेतल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

             सन २०२३/२४ या वर्षापासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकरी हिश्श्याची विमा हफ्ता रक्कम सरकारद्वारे भरण्यात येणार आहे. पीएमएफबीवाय पोर्टलवर स्वतः शेतकर्‍यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्या मार्फतही योजनेतील सहभागाची नोंदणी करता येणार आहे. परंतु, पीक विमा योजनेत सहभाग नोंदणीकरीता सामूहीक सेवा केंद्र धारकांना विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम ४० रुपये देण्यात येत असतांनासुध्दा काही सामूहीक सेवा केंद्र धारकांनी शेतकर्‍यांकडून अतिरिक्त पैसे घ्यावयाचा सपाटा सुरु केला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी सर्व जिल्हा महसूल प्रशासनासह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना सर्व सामूहीक सेवा केंद्र धारकांना आपल्या स्तरावरून सक्त सूचना द्याव्यात, सामूहीक सेवा केंद्राची नियमित तपासणी क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून होईल, या बाबतची कारवाई करावी तसेच सोबत देण्यात येत असलेले प्रसिध्दीपत्रक सेवा केंद्रांवर दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे, अशा सूचना दिल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या