🌟पुर्णा न.पा.प्रशासनाचा रझाकारी कारभार ? तक्रारदारांच्या तक्रारींना न जुमानता काढली निकृष्ट विकासकामांची बिल...!


🌟महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था व पुर्णा नगर परिषदेच्या गैरकारभारा विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात🌟 परभणी/पुर्णा (दि.०५ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी-कंठेश्वर,मौ.धोत्रा,पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावरील मौ.कानडखेड या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थे अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील करोडो रुपयांच्या विकासनिधीतून केली जात असून या कामांचा कालावधी संपल्यानंतर देखील कासवगतीने चालणारी ही काम कालावधी संपल्यानंतर देखील पुर्ण झालेली नसून संबंधित कामाचे कंत्राटदार व्हि.टी.पाटील इंजिनीअर्स अँड कंट्रक्शन औरंगाबाद यांनी ही काम स्वतःच्या नावावर घेऊन स्थानिक सब छोट्या मोठ्या  गुत्तेदारांना बहाल केल्यामुळे या कामांची अवस्था अक्षरशः बदहाल झाल्याचे दिसत असून यातील एकही काम २५% देखील पुर्ण झालेले नाही.


परंतु संबंधित कंत्राटदाराला महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे मुख्य अधिकारी कृष्णा वाघ,कनिष्ठ अभियंता बाचेवाड पाठीशी घालण्याचा सातत्याने प्रयत्न चालवल्याचे दिसत असल्यामुळे या कंत्राटदाराचा समावेश काळ्या यादीत करावा या मागणीसह पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरात विविध भागात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या सिमेंट रोड/सिमेंट नाल्यांच्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी न करता या बोगस तांत्रिक अहवालाच्या आधारे बिल काढण्याचा महापराक्रम करण्यात आल्यामुळे या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी प्रत्येक विकासकामांच्या ठिकाणी शासकीय नियमानुसार अंदाजपत्रक दर्शवणारे फलक लावण्यात यावे या मागणीसाठी पुर्णा येथील रिपब्लिकन सेनेचे पुर्णा शहराध्यक्ष चंद्रमणी रामा लोखंडे यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर काल मंगळवार दि.०४ जुलै २०२३ पासून आमरण उपोषणास सुरुवात केली असून या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या