🌟नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा दैनंदीन आर्थिक व्यवहार भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अधिक्षकाच्या सहीने ?



🌟सरदार दिपकसिंघ रतनसिंघ गल्लीवाले यांनी त्यांच्यासहीचा वापर होऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे🌟

नांदेड (दि.१० जुलै २०२३) - नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे आर्थिक व्यवहार निवासी उपजिल्हाधिकारी व अधिक्षकाच्या संयुक्त सहीने होतात. या व्यवहारांमध्ये अधिक्षक या पदावर कार्यरत असलेले ठाणसिंग बुंगई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांच्या कारभारावर संशय व्यक्त करीत दिपकसिंघ रतनसिंघ गल्लीवाले त्यांच्या सहीचा वापर होऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

     गुरुतागदी सोहळा 2008 तत्कालीन अध्यक्ष डॉ . परविंदरसिंघ पसरिचा यांचे स्विय सहाय्यक असलेले स . ठाणसिंग बुंगई यांचेवर अखंडपाठमध्ये तब्बल 36 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आले होते.त्यानंतर डॉ .पसरिचाचा यांचे पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी ठाणसिंघ .बुंगई यांची पदोन्नती करत गुरुद्वारा बोर्ड अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्य याचिका क्र - 10553/2022 वर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने विद्यमान गुरुद्वारा बोर्डाच्या कार्यकारिणीने कोणतेही धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेऊ नये असा आदेश दिलेला आहे.

      नव्याने अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत असलेले डॉ. परविंदरसिंघ पसरिचा यांनी त्यांचे विश्वासातील असलेले ठाणसिंघ बुंगई यांना भ्रष्टाचाराचे आरोप दुर्लक्षित करून अधीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे. सदर पदोन्नती ही बेकायदेशीर असून न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे धोरणात्मक व आर्थिक विषयाशी संबंधित आहे सदर व्यक्ती भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या सहीच्या अधिकारामुळे अनेक गैरवाव्यवहार होऊन त्यामध्ये सामान्य जिल्हाधिकारी यांच्यावर दोषारोप होण्याची शक्यता असल्याने सदर सहीचे अधिकार रद्द करावेत अशी मागणी स.दीपकसिंघ रतनसिंघ गल्लीवाले यांनी केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या